-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
मालाड पूर्व येथील पठाणवाडीतील रामजी कंपाऊंड येथे उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने कारवाई करून हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी दिलेल्या निर्देशानंतर महापालिकेच्या परिमंडळ उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पी उत्तर सहायक आयुक्त आता कामाला लागले असून जी दक्षिण विभागातील रघुवंशी मिलममधील अनधिकृत इमारतीचे बांधकाम तोडल्यानंतर आता मालाड (Malad) पूर्व येथे सुरु असलेल्या बांधकामांवरच बुलडोझर चढवून हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले आहे.
(हेही वाचा – CC Road : सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी दिवसाला रस्त्यावर धावतात ३७८ रेडीमिक्स मिक्सर)
महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने मालाड (Malad) पूर्व येथील पठाणवाडी, रामजी कंपाउंड (Ramji Compound) येथे अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम स्वतः शोधून काढले. या बांधकामाचे मोजमाप घेतल्यानंतर हे काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली होती मागील २३ एप्रिल २०२५ रोजी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या तक्रारीची दखल घेत या इमारतीवर तात्काळ योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परिमंडळ उपायुक्त भाग्यश्री कापसे (Bhagyashri kapse) यांच्या मार्गदर्शनाखाली पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून हे बांधकाम जमिनदोस्त केले. याठिकाणी तळ मजल्याचे बांधकाम होते आणि त्यावर परानगी न घेता तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरु होता, अशी माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – इराणच्या Abbas Port वर स्फोट, 5 जणांचा मृत्यू; 700 हून अधिक जखमी)
तब्बल ३ दिवस येथील बांधकामाचे पाडकाम सुरु होते. इमारत व कारखाना विभागाचे सहायक अभियंता तसेच इतर ८कर्मचारी आदींनी एक पोकलेन, एक जे.सी.बी., सहा गॅस कटर, १२ कामगारांच्य मदतीने ही कारवाई केली. राणी सती मार्गावर मोठ्याप्रमाणात असलेली वाहतूक कोंडी आणि यामुळे पादचाऱ्यांसह आणि वाहनांना गैरसोय होऊ नये म्हणून ही कारवाई केली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community