-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या सहायक आयुक्तांसमवेत बैठक घेत पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर गुरुवारी लोअर परळ येथील रघुवंशी मिलमधील एका इमारतीच्या वजा बांधकामांवर महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्यावतीने हातोडा चालवण्यात आला. ही इमारत तब्बल दोन माळ्यांची होती आणि न्यायालयाने स्थगिती उठवताच या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. (Unauthorized Construction)
(हेही वाचा – Sanjay Nirupam यांचा शिवसेना उबाठावर हल्लाबोल; म्हणाले, मराठी भाषिकांचे ढोंगी…)
लोअर परळ येथील सुत गिरण म्हणून असलेल्या रघुवंशी मिलच्या आतील बाजूस अनेक इमारतींचे अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून या सर्व इमारतींचा वापर वाणिज्यिक वापरासाठी केला जात आहे. गिरणीच्या जागेत असल्याने आतील बाजुस ही अनधिकृत बांधकामे होत असल्याने महापालिकेच्यावतीने त्यांना नोटीस जारी केल्यानंतर ते न्यायालयात गेले होते. त्यातील प्रथमेश इमारत ही दोन माळ्याची इमारत असून याठिकाणी टॉयाटो गाड्यांचा शो रुम होता. तब्बल ४५०० चौरस फुटांच्या जागेत असलेल्या या इमारतींबाबत प्रथम नगर दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे प्रकरण नगर दिवाणी न्यायालयात आल्याने त्यांनी महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर जी दक्षिण विभागाच्यावतीने गुरुवारी या दोन मजली इमारतींवर तोडक कारवाई केली होती. (Unauthorized Construction)
(हेही वाचा – चतुर्थ आणि तृत्तीय श्रेणीतीलच नव्हे तर BMC च्या इतर कर्मचाऱ्यांनाही माहुलच्या घरांसाठी करता येणार अर्ज)
या गिरणीच्या जागेत अशाप्रकारे अनेक अनधिकृत इमारती असून त्यांनी महापालिकेच्या नियमांचे भंग तसेच अधिनियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला होता. त्यातील काही इमारतींकडून महापालिकेने दंडही वसूल केला आहे. तर काही इमारतींकडून दंड प्रस्तावित असल्याचीही माहिती मिळत आहे. रघुवंशी मिलमधील या एका इमारतीच्या बांधकामावर हातोडा चालवला गेल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थगिती उठताच अन्य बांधकामांवरही कारवाई केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. (Unauthorized Construction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community