Ukraine Drone Attacked Russia : युक्रेनने ओलेन्या (Olenya Air Base) आणि बेलाया (Belaya Air Base) या दोन महत्त्वाच्या रशियन हवाई तळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या सैन्याने ड्रोन हल्ल्याचा वापर केला आहे. ज्या हवाई तळाला लक्ष्य करण्यात आले आहे तो रशिया-युक्रेन सीमेच्या आत खोलवर असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियन सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. युक्रेनमधील सुमी क्षेत्रावर रशियाकडून जोरदार हल्ला करण्यात आला. दरम्यान, युक्रेनियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला युक्रेनियन सैन्याने आतापर्यंत केलेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला (Ukraine Russia drone attack) होता. युक्रेनने विशेषतः रशिया ज्या तळावर बॉम्बहल्ला करण्यासाठी वापरत होता त्या तळाला लक्ष्य केले आहे. (Ukraine Drone Attacked Russia)
(हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर शिकवल्या जाणाऱ्या खोट्या इतिहासाचा बुरखा टराटरा फाडणारा चित्रपट ‘His Story of itihas’)
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदोमीर झेलेन्स्की यांनी रशियाला आव्हान दिले आहे. ते म्हणाले, आम्ही आमच्या देशाच्या संरक्षणाकरिता कटिबध्द आहोत. देशाच्या संरक्षणासाठी युक्रेन कुठल्याही थराला जाण्यास तयार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर दोन्ही देशांत युध्द अधिक भडकण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन यांच्यात जोरदार संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनने म्हटले आहे की त्यांनी रशियामधील अनेक हवाई तळांवर ड्रोनने हल्ला केला आहे. तसेच ४० हून अधिक रशियन लढावू विमाने नष्ट केली आहेत, ज्यांचा वापर रशिया युक्रेनवर बॉम्बहल्ला करण्यासाठी करत होता. युक्रेनचे म्हणणे आहे की, ही तीच विमाने आहेत जी वारंवार युक्रेनवरून उड्डाण करतात आणि बॉम्ब टाकतात.
युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या (SBU) एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांचे ड्रोन रशियन हद्दीत खोलवर जाऊ शकले आणि Tu-95, Tu-22 आणि महागड्या आणि दुर्मिळ A-50 गुप्तचर विमानांसारख्या मोठ्या बॉम्बर्सना नुकसान पोहोचवू शकले. एसबीयूने सांगितले की हा हल्ला रशियातील इर्कुत्स्कच्या दुर्गम भागात असलेल्या “बेलाया” हवाई तळावर झाला. याशिवाय, “ओलेन्या” हवाई तळावरही आग लागल्याचे वृत्त आहे, परंतु अद्याप त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
(हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर शिकवल्या जाणाऱ्या खोट्या इतिहासाचा बुरखा टराटरा फाडणारा चित्रपट ‘His Story of itihas’)
या हल्ल्याला रशिया किंवा इतर देशांनी अद्याप अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही आणि काही तपशील बदलू शकतात, परंतु जर खरे असेल तर, युक्रेनने रशियन हवाई दलावर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असेल. युक्रेनने म्हटले आहे की त्यांचे ड्रोन उडत राहतील आणि ते प्रत्युत्तर देत राहतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community