लंडन : रशिया – युक्रेन युद्धामुळे, युरोपात युद्धाचे ढग तयार होत आहेत, याच पार्श्वभूमीवर युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. युनायटेड किंग्डमच्या ‘वॉर फायटिंग रेडीनेस’ या संरक्षण खात्याचा युद्ध सज्जतेची माहिती देणारा अहवाल सोमवारी प्रकाशित झाला त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. युकेला येणाऱ्या काळात अटलांटिक महासागरात तसेच युरोपात मोठ्या युद्धास सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी देशाची युद्धसज्जतेवर आढावा घेण्यात आहे. (UK)
(हेही वाचा – ST Bus : एसटी प्रवासात आता पुरुषांनाही मिळणार १० ते १५ टक्के सवलत)
“देशाच्या संरक्षण सज्जतेच्या अहवालातून युकेच्या संरक्षण सिद्धतेबद्दल एकवाक्यता निर्माण होईल. त्यातून संपूर्ण देशाला एका उद्देशासाठी तयार करणे हा हेतू आहे. यातून आम्ही आपच्या देशासाठी धोकादायक असलेल्या गोष्टी ओळखण्यासाठी आणि प्रत्यक्ष युद्धाच्यावेळी आपल्या गोष्टींचे संरक्षण करण्याची वेळ येईल, त्यावेळी आपल्या देशातील लोकांना ते सोपे जाईल.” असे विधान युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी केले आहे. यातून युकेचे इरादे स्पष्ट होत आहेत. (UK)
(हेही वाचा – १५००० अनुदानित Ashram School कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात !)
या संरक्षण विषयक अहवालात युकेसाठी असलेल्या धोक्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यांच्याशी सामना करण्यासाठी ६० अजून नव्या धोरणांची आखणी करण्यात आली आहे. त्यातून फक्त युकेच नव्हे तर युकेच्या मित्रदेशांचे संरक्षण करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. युके हा नाटो संघटनेचा सुद्धा सदस्य देश आहे. नाटो संघटना सुद्धा युद्धाची तयारी करत आहे. अशी माहिती आहे. यावरुन युरोपच्या राजकारणात अजून काय खळबळ होणार आहे याकडे सर्वच जगाचे लक्ष लागले आहे. (UK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community