Iran मध्ये दोन बॉम्बस्फोट; १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

259

Iran मध्ये दोन लागोपाठ बॉम्बस्फोट झाले, त्यामुळे हाहाकार उडाला. या स्फोटात १०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे. जनरल कासीम सुलेमानी यांच्या समाधीस्थळावर एक कार्यक्रम सुरू असताना हे स्फोट झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला होता, असे सांगितले जात आहे.

जनरल सुलेमानी यांच्या समाधीस्थळी स्मृतीदिन साजरा करण्यासाठी असंख्य नागरिक येत असतात. याहीवर्षी अनेक जण येथे जमले असताना लागोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले. इराणी प्रसारमाध्यमांनी या बॉम्बस्फोटानंतरची भीषण परिस्थिती दाखविली आहे. प्रसारमाध्यमांच्या व्हिडिओमध्ये रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडलेला दिसत आहे. काही लोक जखमींना रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी नेत आहेत. तर बाकीचे लोक घटनास्थळावरून सैरवैरा पळताना दिसत आहेत.

(हेही वाचा उत्तर प्रदेश एटीएसची महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित ११ संशयितांच्या घरी छापेमारी; महत्वाच्या गोष्टी केल्या जप्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.