भारतावर हल्ले करण्यासाठी Turkey ने पाकड्यांना दिले ड्रोन; नेटकऱ्यांनी तुर्कीला भारताच्या ‘त्या’ उपकाराची करून दिली आठवण

139

भारताने पाकिस्तानमध्ये असलेली दहशतवादी तळे उद्ध्वस्त करून पेहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पण पाकिस्तानने त्याचा उलटवार भारतावर करताना ड्रोन हल्ले केले. हे ड्रोन तुर्कीने (Turkey) पुरवल्याचे समोर आल्यावर भारतातील नेटकऱ्यांनी आता तुर्कीला (Turkey) सोशल मीडियावर चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यासाठी नेटकऱ्यांनी तुर्कीमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा भारत पहिला देश होता ज्याने ‘ऑपरेशन दोस्त’ राबवून भरभरून जीवनावश्यक वस्तू पाठवल्या होत्या, याचीच तुर्कीने परतफेड केली का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुनावले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर तुर्कीने (Turkey) अधिकृत निवेदनाद्वारे पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तुर्कीने एक नौदल जहाज कराची बंदरात पाठवले. नंतर, भारतीय सशस्त्र दलांनी गोळा केलेल्या ढिगाऱ्यांवरून पुष्टी झाली की, पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती राज्यांमधील लष्करी आणि नागरी स्थानांना लक्ष्य करण्यासाठी तुर्की (Turkey) ड्रोनचा वापर केला होता.

(हेही वाचा Pakistan : भारताने सज्जड दम देताच डरपोक पाकिस्तानकडून मुकाटपणे शस्त्रसंधीचे पालन )

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यावर टीका केली. जेव्हा तुर्कीला सर्वात जास्त मदतीची आवश्यकता होती तेव्हा भारताने मदत केली, याची तुर्कीने (Turkey) अशी ‘परतफेड’ केल्याचा आरोप केला. नेटकऱ्यांनी २०२३ मध्ये तुर्की-सीरिया भूकंपाचा संदर्भ देत आहेत, ज्यामध्ये हे देश उद्ध्वस्त झाले होते. या आपत्तीत एकट्या तुर्कीमध्ये (Turkey) ५३,५३७ लोकांचा मृत्यू झाला. जीवितहानी व्यतिरि देशात दहा लाखांहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.  त्यांच्या कृषी उत्पादनाच्या सुमारे २० टक्के उत्पादनावर परिणाम झाला होता.

अशा वेळी तुर्कीला (Turkey) मदत देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता, दोन्ही देशांना सुमारे ७ कोटी रुपयांचे मदत साहित्य पाठवले. सरकारने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले. या विमानात भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान तुर्कीच्या अडाना शहरात पाठवण्यात आले. या विमानात वैद्यकीय पथके, एनडीआरएफ पथके आणि उपकरणे, स्निफर डॉग स्क्वॉड आणि इतर अधिकारी मदत साहित्यासह बॅचमध्ये होते. त्यावेळी तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी गरजेला येणार मित्र खरा मित्र असतो, असे म्हणत भारताचे खूप खूप आभार, असे म्हटले होते. नेटकऱ्यांनी या सगळ्याची तुर्कीला (Turkey) आठवण करून देत तुर्कीच्या कृतघ्न वागणूक उघड केली.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.