
-
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शक्तिपीठ श्री तुळजाभवानी मंदिराच्या (Tuljabhavani Temple) सर्वांगीण विकासासाठी १८६५ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजनास सज्ज होणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पासाठी शासन तीन ते साडेतीन वर्षात काम पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही परिवहन व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, तसेच पोलीस व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – India Tour of England : शुभमन गिलच्या पाठीवर प्रतिस्पर्धी खेळाडूची कौतुकाची छाप)
शक्तिपीठाच्या गौरवासाठी भव्य आराखडा
मंत्री सरनाईक म्हणाले, “श्री तुळजाभवानी देवी (Tuljabhavani Temple) हे महाराष्ट्रातील पूर्ण शक्तिपीठ असून, छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. दरवर्षी १.५ कोटींपर्यंत भाविक इथे येतात. त्यांच्या सोयी-सुविधा, श्रद्धास्थळाचे संवर्धन आणि तुळजापूर शहराचा कायापालट या उद्देशाने हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.” आराखड्यात मंदिर परिसराचे आधुनिकीकरण, वाहतूक, पाणीपुरवठा, रस्ते, यात्रेकरू सुविधा, आणि सुरक्षा उपाययोजना यांचा समावेश आहे. भूसंपादन, तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रिया एकाच वेळी सुरू करण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांना आषाढी एकादशीच्या महापूजेचे निमंत्रण; श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सज्ज पंढरपूर)
अष्टभुजा मूर्तीवर भक्तगणांचा आक्षेप; बदलाचे निर्देश
विकास आराखड्यांतर्गत १०८ फुट उंच शिल्पात तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहेत, असा देखावा आहे. मात्र देवीची प्रतिमा अष्टभुजा दाखवण्यात आल्याने भक्तगण आणि पुजारी वर्गाने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “देवीच्या प्रतिमेची आखणी करताना पुरातत्व तज्ञ, इतिहासकार व धार्मिक जाणकारांशी सल्लामसलत करावी. संकेतस्थळावरील प्रतिमा तात्काळ हटवावी. यापुढे कोणतीही माहिती अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय प्रसिद्ध न करणे, हेही अधिकारी लक्षात ठेवावं.” या भव्य प्रकल्पामुळे तुळजापूरचं धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व आणखी वाढणार आहे. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, तुळजाभवानी (Tuljabhavani Temple) देवीच्या सेवेसाठी हे एक सुवर्णपान ठरणार आहे!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community