Tulbul Navigation Project : काश्मीरमधील झेलम नदीवरील अर्धवट राहिलेल्या तुळबुल प्रकल्पा(Tulbul Navigation Project)वरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी तुळबुल प्रकल्पाबाबत मोठी मागणी केली असून भारत सरकारने स्थगित केलेला सिंधू नदी कराराचा फायदा उठविण्याचा मानस त्यांनी दाखविला आहे.
(हेही वाचा Jammu and Kashmir : SIA ची काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी ; दहशतवादी हालचालींबद्दल मिळाली माहिती )
दरम्यान, ओमर अब्दुल्ला असोत किंवा मेहबूबा मुफ्ती सत्तेत असो, ते जेव्हा नेहमी सत्तेत असताना ते भारताबद्दल बोलतात. पण विरोधात जाताच ते विरोधाचे सूर गाऊ लागतात, हेच या प्रकरणातूनही दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी)च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यात तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्प(Tulbul Navigation Project) आणि सिंधू पाणी करारावरून जोरदार वाद सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांची नेमकी भूमिका काय?
जम्मू आणि काश्मीरच्या नद्यांचा लोकांच्या हितासाठी वापर करण्यासाठी मागणी करत राहीन. अब्दुल्लाह म्हणाले, त्यांना पाणी थांबवायचे नाही तर ते त्यांच्या लोकांसाठी अधिक वापरायचे आहे. असे सांगतानाच त्यांनी पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा समाचार घेत त्यांनी आता पोस्ट करत राहावे, ते आता खरं काम करत आहेत, असे म्हणत मुफ्तींच्या विधानाची खिल्ली उडवली. आम्हाला वाद खालच्या स्तरावर न्यायचा नाही, असेही मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती काय म्हणाल्या
पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी १९८०च्या दशकात सुरू झालेल्या तुळबुल प्रकल्पाचा उल्लेख केला. जो पाकिस्तानच्या विरोधामुळे सिंधू पाणी कराराअंतर्गत थांबवण्यात आला होता. पंरतु, आता सिंधु जलकरार स्थगित झाल्यानंतर आता तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख अब्दुल्ला यांचा उल्लेख करताना मेहबूबा म्हणाल्या की, सत्ता गमावल्यानंतर त्यांनी पाकिस्तानात सामील होण्याची मागणी केली होती. परंतु, नंतर ते भारतात सामील झाले. त्यांनी ओमर अब्दुल्लाह यांच्यावर राजकीय सोयीनुसार आपली भूमिका बदलल्याचा आरोपदेखील केला आहे.
तुळबुल नेव्हिगेशन प्रोजेक्ट(Tulbul Navigation Project)बाबत तज्ज्ञांचं म्हणणं काय?
दीर्घकाळ रखडलेल्या तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाला सुरुवात करण्याची वेळ भारत सरकारवर आली आहे, असे मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसचे वरिष्ठ फेलो उत्तम सिन्हा म्हणाले. जवळजवळ चार दशकांपासून काश्मीरी लोकांच्या विकासात्मक आकांक्षा ह्या राजनैतिक सावधगिरीसमोर बळी पडल्या होत्या, जरी त्याची अंमलबजावणी कराराच्या चौकटीतच येत असेल, असे ते म्हणाले.(Tulbul Navigation Project)