-
प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील पलस्पे येथील ओसियन गेट पार्किंगमध्ये एक संशयास्पद ट्रक आढळून आला असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फोर्टीफाईड तांदूळ (Fortified Rice) भरलेला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा तांदूळ एक्स्पोर्टसाठी पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पनवेलचे पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी सदर ट्रकची तपासणी केली असता, हा तांदूळ फोर्टीफाईड असल्याचे स्पष्ट झाले – म्हणजेच हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीत (रेशन दुकानांमध्ये) वितरित केला जाणारा आहे.
(हेही वाचा – Blast in Lahore : पाकड्यांची तंतरली ! लाहोर विमातनळाजवळ सलग तीन स्फोट ; पाकिस्तानी सैन्याने केली मोठी चूक)
या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, गरिबांच्या हक्काचा तांदूळ परस्पर निर्यात करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सरकारी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या अन्नधान्याचा असा गैरवापर होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यामुळे संबंधित पुरवठा यंत्रणेतील गोंधळ, दुर्लक्ष किंवा मिलीभगतीचा संशय बळावला आहे. (Fortified Rice)
(हेही वाचा – Rohit Sharma Retires : रोहितच्या कसोटी निवृत्तीवर कुणी काय प्रतिक्रिया दिली?)
सध्या अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ट्रक मालक, ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि निर्यात कंपनी यांची चौकशी केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, रेशन यंत्रणेतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Fortified Rice)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community