Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

154
Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

समृद्धी महामार्गावरील ( samruddhi Highway) सिंदखेडराजा परिसरात गुरुवारी, (११ एप्रिल) सायंकाळी सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत. (Truck-Eicher Accident)

रंजित गौतम (४०, रा.सुलतानपूर उत्तर प्रदेश) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या अपघातात संतोष छोटूलाल हरिजन (२५, उरण), महिंद्र गौतम (५०, रा. सुलतानपूर उत्तर प्रदेश), सोनू गौतम (३०, रा. सुलतानपूर उत्तर प्रदेश) हे तीन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Pipal Tree: २४ तास ऑक्सिजन पुरवणाऱ्या पिंपळाच्या झाडाचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? )

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक क्रमांक एमएच ०४ के एफ ८७४० सिंदखेडराजा मुंबईवरून कलकत्त्याकडे निघाला होता. (Buldhana)परिसरात आयशर आला असता, समृद्धी महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आशयर अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकला.

या घटनेत आयशर चालक रंजित गौतम याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोलीस हेड कॉस्टेबल काळुसे, पोलीस कॉस्टेबल सानप, एमएसएफ जवान गजानन जाधव, नागरे, राठोड, क्यू आर व्ही टीम उपस्थित होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेचा अधिकचा तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.