बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता ज्येष्ठ आणि लहानग्यांना प्रवासासाठी ट्रॉली वाहने उपलब्ध झाली आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते वनराणीतील एक किलोमीटर जागेचा प्रवास करण्यासाठी ही ट्रॉली वाहने उपलब्ध राहतील. ही सुविधा सोमवारपासून विनामूल्य उपलब्ध होणार आहे. राज्याच्या वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी या वाहनांचे उद्धाटन केले.
( हेही वाचा : रेशन कार्ड आधारला लिंक करून मिळवा ‘हे’ फायदे )
उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला रॉटरी क्लबने सीएसआर फंडातून उपलब्ध झाली आहे. तीन वाहनांसाठी १७ लाखांचा खर्च आल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली. एका वाहनात केवळ पाच-सहा आसने आहेत.
अधिकाऱ्यांनी दिली माहिती
उद्यानात खासगी वाहनांना बंदी आणली असल्याने गेल्या काही वर्षांत वृद्धांसाठी उद्यानात फेरफटका मारणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात ही मागणी होत होती, असे अधिका-यांनी सांगितले. मात्र कान्हेरी गुफेसाठी बससेवा उपलब्ध आहे. इतर उद्यानातील भागांत फेरीसाठी चालतच फेरफटका मारावा लागेल. उद्यानातील व्याघ्र आणि सिंह सफारीसाठी वनराणी ते सफारीपर्यंत एक किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागेल, अशी माहिती अधिका-यांनी दिली.