सावरकरांची महती सांगणारा कंदिल, स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना

135

दिवाळी सणानिमित्त घरोघरी कंदिल आणि तोरणांची रोषणाई करण्यात येते. यामध्ये अनेकदा अनेक कल्पक कंदिल दिसून येतात. असाच एक कंदिल तयार केला आहे तो परभणीच्या महेश परळीकर यांनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील ठळक प्रसंगांचे चित्र काढून पर्यावरणपूरक असा आकाश कंदिल परळीकर यांनी तयार केला आहे. फेसबूक पोस्ट शेअर करत त्यांनी या कंदिलाची झलक दाखवली आहे.

स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यातील प्रसंगांचे रेखाटन

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनंत कष्ट सोसले. त्यांची माहिती या कंदिलावर रेखाटलेल्या चित्रांतून देण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारही या कंदिलाच्या माध्यमातून ठळकपणे मांडण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भगूर येथे अष्टभूजा देवीसमोर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा, मार्सायच्या समुद्रात घेतलेली ऐतिहासिक उडी, अंदमानच्या सेल्युवर जेलमध्ये सावरकरांना भोगावी लागलेली कोलूसारखी भीषण शिक्षा, तरीही त्या परिस्थितीत सावरकरांनी कारागृहाच्या भिंतींवर रचलेले काव्य, अशा विविध प्रसंगांचं अगदी सुरेख रेखाटन करुन महेश परळीकर यांनी हा कंदील तयार केला आहे.

सावरकरांना अभिवादन

तसेच हिंदुस्थान कोहिनूर स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजर,असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन देखील करण्यात आले आहे. तसेच काळ्या पाण्याच्या शिक्षेबाबत सावरकरांनी मांडलेले आपले विचार देखील या कंदिलाच्या माध्यमातून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न परळीकर यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.