
-
प्रतिनिधी
Tree Plantation राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. ड्रोन, उपग्रह (Satellite) आणि जीआयएस (GIS) प्रणालीचा वापर करून वृक्षारोपण मोहिमेचे ‘रिअल-टाईम’ मॉनिटरिंग करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेला आता ‘हायटेक’ दिशा दिली आहे. या मोहिमेत लोकसहभाग आणि खासगी-सार्वजनिक भागीदारी (PPP) मॉडेलचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. (Tree Plantation)
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : विकास करार रद्द केल्यास आता मुद्रांक शुल्क बुडणार; सरकारचा महसूल वाढवण्यावर मोठा भर!)
वृक्षारोपणाचे केवळ नियोजन करून न थांबता, लागवड केलेल्या प्रत्येक रोपाची वाढ सहा महिन्यांपर्यंत अचूकपणे तपासली जाणार आहे. यासाठी ‘लँड बँक’ तयार करण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी स्वतःच्या जमिनींचा आराखडा केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्यास निधी मिळवण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. वन विभागाकडे सध्या सहा कोटी रोपे तयार असून, ही क्षमता दहा कोटींपर्यंत नेण्यासाठी खासगी रोपवाटिकांची मदत घेतली जाणार आहे. (Tree Plantation)
(हेही वाचा – नाशिक टीसीएस प्रकरणी Nida Khan च्या जामिनावर जुलैच्या ‘या’ दिवशी होणार ‘फायनल’ फैसला)
वन विभाग आता केवळ रोपे पुरवठादार न राहता गुणवत्ता नियंत्रकाची भूमिका बजावणार आहे, तर रोपांच्या निर्मिती आणि वितरणात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवून एक शाश्वत परिसंस्था उभी केली जाणार आहे. कृषी विद्यापीठे आणि विविध सरकारी संस्थांकडील पडीक जमिनींचा वापर करून हरित महाराष्ट्र करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि वन अधिकाऱ्यांना आता कडक समन्वयाचे आदेश दिले आहेत. या डिजिटल मोहिमेमुळे वृक्षारोपणातील पारदर्शकता वाढून, राज्याच्या कानाकोपऱ्यात हिरवळ फुलवण्याचे सरकारचे ध्येय सुकर होणार आहे. (Tree Plantation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
