Tree Cutting : मुंबईत पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची कापाकापी करताना आर्बोरिस्टचा विसर

उद्यान विभाग शासनाचे आदेश मानायला नाही तयार?

722
Tree Cutting : मुंबईत पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची कापाकापी करताना आर्बोरिस्टचा विसर

मुंबईतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना वृक्ष तज्ज्ञांची अर्थात आर्बोरिस्टची मदत घेण्याचे निर्देश राज्य शासनाने जारी करत अशाप्रकारच्या संस्थांची नावेही जाहीर केली. परंतु मुंबईतील रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी (Tree Cutting) करताना महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली असून यंत्राचा वापर करून याची छाटणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात शासनाने सुचवलेल्या आर्बोरिस्टची मदत घेतली जात नसल्याने भविष्यात वृक्षांची फांदी तुटून अथवा वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना झाल्यास त्याला महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारीच जबाबदार ठरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Tree Cutting)

९९ हजार २०३ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्‍हणून मोठ्या झाडांच्‍या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्‍या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची (Tree Cutting) कामे उद्यान विभागाकडून सुरू आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण एक लाख ११ हजार ६७० झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे, पैकी १२ हजार ४६७ झाडांची छाटणी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९९ हजार २०३ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. (Tree Cutting)

तब्बल १५ लाख ५१ हजार झाडे खासगी संस्थांच्या आवारांत

मुंबईत साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करुन छाटणीची (Tree Cutting) कामे निश्चित करण्यात येतात. जी झाडे लहान असतात, ज्यांच्यापासून कोणताच धोका नसतो, अशांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही. (Tree Cutting)

(हेही वाचा – Adani Greens RE Park : अक्षय्य ऊर्जा क्षेत्रासाठी अदानी ग्रीन एनर्जी कंपनी करणार १.५ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक)

रस्‍त्‍यांच्‍या कडेला सुमारे १ लाख ११ हजार ६७० झाडे

या प्रक्रियेनुसार, उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख ८६ हजार २४६ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्‍त्‍यांच्‍या कडेला सुमारे १ लाख ११ हजार ६७० झाडे आहेत. ५ एप्रिल २०२४ पर्यंत १२ हजार ४६७ झाडांच्या फांद्यांची छाटणी (Tree Cutting) करण्‍यात आली आहे. तर दिनांक ७ जून २०२४ अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्‍या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या कामी यंत्रसामुग्री, मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. त्याचप्रमाणे, खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. (Tree Cutting)

खासगी सोसायटींच्या जागेवरील झाडांसाठी १ हजार ८५५ जणांना नोटीस

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महानगरपालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. परंतु, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्‍या छाटणीकामी (Tree Cutting), संतुलित करणेकामी महानगरपालिकेने १ हजार ८५५ नोटीस दिल्‍या असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले. (Tree Cutting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.