पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या Turkey आणि अजरबैजानवर ट्रॅव्हल्स एजंटचा बहिष्कार 

'ट्रॅव्हल्स एजंट्स ऑफ इंडिया'च्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्रात मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

87

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने (TAAI) एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. येत्या काळात भारतीय पर्यटकांना तुर्की (Turkey) आणि अजरबैजान या देशांत पाठवले जाणार नाही. कारण या दोन्ही देशांनी ऑपरेशन सिंदूर सुरु असताना पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कीने (Turkey) भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याचे समोर आले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष प्रियंका खडसे यांनी सांगितले की, तुर्की (Turkey) आणि अजरबैजानने अलीकडेच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय मंचावरील भूमिकांना पाठिंबा दिला आहे. या घटनांमुळे भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या असून, अशा देशांमध्ये भारतीय पर्यटकांनी पैसे खर्च करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल.

(हेही वाचा भारतीय नागरिकांनाच देशात राहण्याचा अधिकार Rohingya यांना नाही; Supreme Court चा आदेश)

‘ट्रॅव्हल्स एजंट्स ऑफ इंडिया’च्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्रात मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर आणि विदर्भातील ट्रॅव्हल कंपन्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे पर्यटकांना पर्याय म्हणून भारतातील आणि इतर अनुकूल देशांचे पर्यटन करण्यास प्रवृत्त केले जाईल, असे सांगण्यात आले. या निर्णयामुळे भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले असून, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील ट्रॅव्हल एजंट्समध्येही यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. काही ट्रॅव्हल कंपन्यांनी या निर्णयाचे समर्थन करत ‘राष्ट्र प्रथम’ हे धोरण ठेवले पाहिजे, असे मत नोंदवले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.