Taxi करता सीएनजीच्या इर्टिगा, बोलेरो गाड्यांना परवानगी देण्याच्या मागणीकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष

कल्याण-मुरबाड तालुक्यात चालणाऱ्या मोटर्स टॅक्सीचे (Taxi) 20 वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या टॅक्सीवर परिवहन कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भूमिपुत्र टॅक्सी संघटनेचे परिवहन विभागाला निवेदन दिले.

85

सध्या महाराष्ट्रात प्रदूषण कायद्याच्या माध्यमातून २० वर्षे वयोमान पूर्ण झालेल्या काळ्या-पिवळ्या जुन्या टॅक्सी (Taxi) परिवहन विभाग पकडून घेते आणि त्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे आता टॅक्सी चालकांना नवीन गाडी घ्यावी लागत आहे. मात्र परिवहन विभाग केवळ इको गाडीलाच परवानगी देत आहे. २०१३ पासून केवळ याच गाडीला परवानगी मिळत आहे. वस्तुतः ही गाडी प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे सीएनजीवरील इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र टॅक्सी (Taxi) संघटनेने परिवहन विभागाकडे ३१ जानेवारी २०२५ रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती, मात्र अद्याप त्यावर परिवहन विभाग निर्णय घेत नसल्याने मागील ४ महिन्यांपासून हे व्यवसाय बंद पडला आहे. कल्याण मुरबाड मार्गावरील सुमारे १५० हुन अधिक टॅक्सी चालकांचा व्यवसाय बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कल्याण मुरबाड मार्गावर चालणाऱ्या भूमिपुत्र टॅक्सी (Taxi) संघटनेचे कैलास घोलप म्हणाले, इको गाडी हे धोकादायक आहे. या गाडीला अपघात झाला तर त्यातील प्रवाशांचा मृत्यू होण्याची संभावना अधिक असते. या गाडीची चाकेही छोटी आहे आणि गाडी उंचीला अधिक आहे. त्यामुळे ही गाडी वळणाला कलंडते. गाडीचे दरवाजे सरकवण्याचे आहेत. त्यामुळे अपघात झाल्यावर दरवाजे कापून काढावे लागतात. अशा प्रकारे ही गाडी सर्वच बाबतीत असुरक्षित आहे. त्यामुळे परिवहन विभागाने या गाडीसोबत सीएनजीमधील इर्टिगा आणि बुलेरो या गाडयांना परवानगी द्यावी, अशी मागणी परिवहन विभागाला केली आहे.

(हेही वाचा West Bengal Violence : ममतांचे राज्य की हिंसाचाराचे साम्राज्य?)

कल्याण-मुरबाड तालुक्यात चालणाऱ्या मोटर्स टॅक्सीचे (Taxi) 20 वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या टॅक्सीवर परिवहन कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भूमिपुत्र टॅक्सी संघटनेचे परिवहन विभागाला निवेदन दिले, त्यात CNG मध्ये (मारुती कंपनीची) इर्टिका गाडी, (महेंद्र कंपनीची) बोलेरो गाडी, (फोर्स कंपनीची) गामा गाडी, या पैकी कोणत्यातरी एक CNG गाडीस (TC अप्रोवल) परवाना मिळावा, अशी मागणी केली. सध्या टॅक्सी (Taxi) चालक ट्रॅक्स या कंपनीचे गामा गाडी वापरत होते, ती गाडी डिझेलवर चालणारी होती. ही गाडी कंपनीने बंद केली आहे. त्याचप्रमाणे डिझेलवर इंधनावर चालणारे अन्य वाहन म्हणून महेंद्रा कंपनीची बोलेरो उपलब्ध आहे. मुंबईतील विशिष्ट वयोमर्यादेनंतरची परिवहन वाहने सी.एन.जी./ एल.पी.जी. इंधनावरील रुपांतरीत झाली नाहीत तर जी वापरातून बाद करण्याबाबत यावीत म्हणून उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. याकरीता प्राधिकरणाने वेगवेगळ्या संवर्गातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची वयोमर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांवर परमिट चढवून मिळावी, अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी परिवहन विभागाची मागील चार महिन्यांपासून बैठकच झाली नाही. त्यामुळे टॅक्सी (Taxi) चालकांची उपासमारी सुरु झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.