-
प्रतिनिधी
म्हाडाच्या वतीने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प (Worli BDD) राबविण्यात येत आहे. त्यानुसार वरळी बीडीडी चाळीतील ९ हजार ८६९ पुनर्वसन सदनिकांपैकी ३ हजार ८८८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन आठवड्यात ५५६ सदनिकांचे हस्तांतरण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. तसेच वरळी बीडीडीतील १ हजार ४१९ सदनिकांचे सप्टेंबर २०२५ मध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर उर्वरित १ हजार ६४२ सदनिकांचे हस्तांतरण ऑगस्ट २०२७ पर्यंत करण्याचे नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ आणि इतर प्रकल्पांची आढावा बैठक गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी म्हाडाच्या वतीने बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यात आली.
(हेही वाचा – BMC : कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्या खासगी कंत्राटदारांवर होणार कारवाई; कर्तव्यात कसुर करणारे कामगारही रडारवर)
नायगाव बीडीडी चाळीतील (Worli BDD) ३ हजार ३४४ सदनिकांपैकी १ हजार ९३८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर २०२५ मध्ये ८६४ सदनिकांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन आहे. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या प्रकल्पातील २ हजार ५६० पुनर्वसन सदनिकांपैकी १ हजार २४१ सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी ३४२ सदनिकांचे हस्तांतरण डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील सिद्धार्थनगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ ६७२ सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या प्रकल्पातील तीन भूखंडावरील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून चार भूखंडावरील एकूण १ हजार २४३ सदनिका बांधकामासाठी कार्यादेश जारी करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
(हेही वाचा – केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचा टोला; ‘म्हणाले; राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही’)
याशिवाय सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, आरामनगर अभिन्यासाचा पुनर्विकास, मोतीलाल नगर, अभ्युदयनगर प्रकल्प, वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्शनगर वरळी वसाहत, जीटीबी नगर सायन कोळीवाडा वसाहत, पीएमजीपी वसाहत, पूनमनगर प्रकल्प तसेच मुंबई महानगर ग्रोथ हब आदी प्रकल्पांच्या पुनर्विकास प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी म्हाडाने योग्य सुधारणा करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते. (Worli BDD)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community