Trans Harbour मार्गावर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

108

Trans Harbour : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान गर्डर वाकला आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ९ आणि १० यावरून अद्याप एकही लोकल वाशी आणि पनवेलच्या दिशेने रवाना झालेली नाही. त्यामुळे या मार्गावरील सर्वच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. (Trans Harbour)

शुक्रवारी सकाळी ऐरोली येथे रात्रीच्या बांधकामादरम्यान गर्डर चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट झाल्यामुळे मुंबईच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. गर्दीच्या वेळी हजारो दैनंदिन प्रवासी अडकून पडले, या प्रवाशांनी आता बसचा पर्याय शोधला आहे. तसेच ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा सकाळी ७:१० वाजल्यापासून बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गुरुवारी रात्री बसवण्यात आलेले गर्डर पडले.

(हेही वाचा – IPL to Halt ? भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्यावर बीसीसीआयचा विचार सुरू)

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “ठाणे आणि ऐरोली दरम्यान लॉन्च गर्डर लावण्यासाठी MMRDA ने ट्रान्स हार्बर लाईनवर रात्री १.०० ते ४.०० पर्यंत ब्लॉक घेतला होता. लॉन्च केलेले गर्डर झुकलेले असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ७.१० वाजल्यापासून वाहतूक बंद आहे. तसेच गर्डर दुरुस्त करण्याचे काम सकाळी ८:१५ वाजता सुरू झाले आहे. हे काम काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.