Western Railway : ऐन गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेचा खोळंबा; तब्बल 22 गाड्या केल्या रद्द

90

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे, अनेक जण गणेशोत्सवासाठी गावाला जात आहेत, त्यासाठी प्रवासाची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे, पण दुर्दैवाने पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील (Western Railway Route) 22 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील एक्सप्रेस वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) रतलाम विभागात मुसळधार पावसामुळे मुंबई सेंट्रलहून दिल्ली, गुजरात, राजस्थानसाठी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन, ऑगस्ट क्रांती, तेजस राजधानी एक्स्प्रेससह एकूण 19 रेल्वेगाड्यांच्या खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी

गोध्रामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी साचले असून पाण्याची पातळी सतत वाढताना दिसत आहे. यामुळे पश्चिम रेल्वे सेवेवर (Western Railway) परिणाम झाला आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. इंदूर दोंड अवंतिका एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. राजधानीसह अवध पश्चिम सुवर्ण मंदिर जम्मू तावी एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी अडकून पडले होते. मुंबई आणि दिल्ली दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने राजधानीसह पॅसेंजर गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे. तर, काही लोकल मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा Parliament Special Session 2023 : संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये ‘या’ विधयकांवर होणार चर्चा)

गाडी क्रमांक 12953 मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन रविवारी सायंकाळी 5.10 वाजता सुटणार होती. पावसामुळे सात तास विलंबाने रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता रवाना करण्यात आली. गाडी क्रमांक 12961 मुंबई सेंट्रल – इंदूर-मुंबई सेंट्रल अवंतिका एक्स्प्रेस, इंदूर-दौंड- इंदूर एक्स्प्रेस, नागदा-रतलाम विशेष रतलाम – उज्जैन विशेष, दाहोद- रतलाम- दाहोद विशेष, रतलाम-नागदा विशेष या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 12939 पुणे-जयपूर जेसीओ ही गाडी 17 सप्टेंबर रोजी भेस्तान-जळगाव – भुसावळ – इटारसी – भोपाळ – संत हिरदरम नगर नगडा या मार्गावर वळवण्यात आली आहे.

या गाड्या केल्या रद्द 

  • 22930 वडोदरा-डहाणू रोड 22929 डहाणू रोड- वडोदरा
  • 09156 वडोदरा सुरत 09155 सुरत – वडोदरा जेसीओ रद्द
  • 09318 आनंद वडोदरा
  • 22953 मुंबई -अहमदाबाद
  • 22954 अहमदाबाद – मुंबई
  • 20901 मुंबई-गांधीनगर वंदे भारत
  • 20902 गांधीनगर-मुंबई वंदे भारत 12009 मुंबई – अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस
  • 12010 अहमदाबाद – मुंबई
  • 19015 दादर – पोरबंदर
  • 12925 बांद्रा टी-अमृतसर
  • 12931 मुंबई-अहमदाबाद
  • 12932 अहमदाबाद – मुंबई
  • 12933 मुंबई – अहमदाबाद
  • 12934 अहमदाबाद -मुंबई
  • 82902 अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस
  • 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस
  • 12471 बांद्रा टर्मिनस-श्री मारा वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेस
  • 09172 भरुच-सुरत
  • 04711 बिकानेर-बांद्रा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.