दापोली-खेड मार्गावर वाहतूक लवकरच पूर्ववत होणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांची ग्वाही

64
दापोली-खेड मार्गावर वाहतूक लवकरच पूर्ववत होणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांची ग्वाही
दापोली-खेड मार्गावर वाहतूक लवकरच पूर्ववत होणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांची ग्वाही

अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला दापोली-खेड मुख्य मार्ग लवकरच नागरिकांसाठी पूर्णतः खुला होणार आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांत संपूर्ण दुरुस्ती पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

दापोली ते खेड या महत्त्वाच्या मार्गाची पाहणी करताना मंत्री कदम यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

(हेही वाचा – बीडीडी चाळीतील रहिवाशांना श्रावणाआधी नव्या घराची चावी मिळणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा)

“दापोली-खेड मार्ग म्हणजे या परिसराची जीवनवाहिनी”

पाहणीवेळी बोलताना गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, “दापोली आणि खेड तालुक्यांना जोडणारा हा रस्ता ही येथील जनतेची जीवनवाहिनी आहे. या मार्गावरील वाहतुकीत झालेल्या अडथळ्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, याची मला पूर्ण जाणीव आहे. सध्या रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. मात्र पुढील १५ दिवसांत काम पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि टिकाऊ मार्ग देण्याचा आमचा निर्धार आहे.”

“महायुती सरकार नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे”

ते पुढे म्हणाले, “राज्य सरकार (State Govt) आणि महायुती सरकार (Mahayuti) हे केवळ घोषणा करणारे नाहीत, तर कृती करणारे सरकार आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत. आपत्तीच्या काळात कोणताही भाग दुर्लक्षित राहणार नाही. जनतेच्या सुखदु:खात सरकार सहभागी राहणार आहे.”

गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या या तत्काळ हस्तक्षेपामुळे दापोली-खेड मार्गाच्या दुरुस्तीला गती मिळाली आहे. या मार्गाच्या पुनर्बांधणीमुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासन आणि यंत्रणा कामाला लागली असून, लवकरच हा मार्ग पूर्ववत होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.