Railway : हार्बर रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत

63
Railway : हर्बर रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत
Railway : हर्बर रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हार्बरच्या दोन्ही मार्गांवरील (harbor railway) वाहतूक एक वाजल्यापासून ठप्प झाली होती. पनवेल सीएसएमटीदरम्यानची (Railway) वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल.

कुर्ला यार्डला जाण्यासाठी ट्रॉम्बे यार्ड येथून मालगाडी निघाली. मालगाडीच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण होत होती. त्यामुळे मालगाडी कुर्ल्याजवळ थांबली. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजल्यापासून ठप्प झाली होती, मात्र मालगाडीतील तांत्रिक बिघाडात दुरुस्ती केल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक  दुपारी २ च्या सुमारास पूर्ववत सुरू करण्यात आली.

(हेही वाचा – Sharad Pawar on Maratha Reservation : सरकार बघ्याची भूमिका घेते का ?; शरद पवार यांचा मराठा आरक्षणप्रकरणी थेट प्रश्न )

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.