Honking Traffic Challan : वाहनचालकांनो या परिसरात हॉर्न वाजवल्यास भरावा लागणार दंड

80

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर कारवाई केली जाते आणि वाहतूक अधिकाऱ्यांकडून सुद्धा चलन कापले जाते. काही प्रकरणांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते परंतु तुम्हाला माहिती आहे का विनाकारण हॉर्न वाजवल्याने (Honking In No Horn Zone) सुद्धा तुमचे चलन कापले जाऊ शकते.

नो हॉर्न झोन क्षेत्रात हॉर्न वाजवल्यास दंड 

शहरामध्ये अशा काही जागा असतात जिथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे अशा ठिकाणांना नो हॉर्न प्लेस (No Horn Place) किंवा नो हॉर्न झोन (No Horn Zone) असे म्हटले जाते. शाळा, रुग्णालय परिसर आणि आजूबाजूचे रस्ते याठिकाणी नो हॉर्न झोन असतो. या ठिकाणांवर नो हॉर्न झोन किंवा साईन बोर्ड लावले जातात असा बोर्ड लावलेला असताना तुम्ही हॉर्न वाजवताना पकडले गेलात तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड भरावा लागेल.

( हेही वाचा : बेपत्ता मुलांच्या शोधासाठी “ऑपरेशन री- युनायट”)

हा नियम ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी बनवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी नो हॉर्न झोनमध्ये हॉर्न वाजवू नये. त्यामुळे गरजेपुरता हॉर्नचा वापर करा असे वाहतूक पोलिसांकडून सुद्धा सांगितले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.