Tomato Prices : काही आठवड्यांत टोमॅटोच्या किमती ३०० प्रती किलोवरून १५ रुपयांवर 

टोमॅटोच्या किमतींनी काही आठवड्यांपूर्वी किलोमागे ३०० रुपयांचा भाव गाठला होता. आता याच किमती कमी होऊन अगदी १५ रुपये प्रती किलोवर आल्या आहेत. 

129
Tomato Prices : काही आठवड्यांत टोमॅटोच्या किमती ३०० प्रती किलोवरून १५ रुपयांवर 
Tomato Prices : काही आठवड्यांत टोमॅटोच्या किमती ३०० प्रती किलोवरून १५ रुपयांवर 

ऋजुता लुकतुके

देशभरात टोमॅटोच्या किमती मागच्या काही आठवड्यात १५ रुपये प्रती किलोपर्यंत खाली आल्या आहेत. आणि तज्जांच्या मते या किमती ५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. थोडक्यात काही आठवड्यांपूर्वी ३०० रुपये प्रती किलो ते आता १५ रुपये असा टोमॅटोच्या किमतीचा प्रवास झाला आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रवास नक्कीच चांगला नाही. खासकरून दक्षिणेतील बाजारांमध्ये टोमॅटोचे भाव दिवसाला २० टक्क्यांनी उतरले आहेत. हा कल रविवारपर्यंत असाच सुरू होता. तर कर्नाटकमध्ये टोमॅटोचे भाव ३० रुपये प्रती किलो होते.

सध्या भारतात नेपाळ आणि इतर बाहेरच्या देशातून आयात केलेले टोमॅटो बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतातून टोमॅटोची मागणीही कमी झाली आहे. आणि याचाच फटका पश्चिम तसंच दक्षिणेतील राज्यांना आता बसतोय. तिथल्या टोमॅटोच्या मालाला उठाव कमी झालाय. ही परिस्थिती येत्या काही दिवसांत सुधारण्याची शक्यता नसल्याने देशभरात टोमॅटोचे दरच ५ रुपये प्रती किलोपर्यंत खाली येतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

(हेही वाचा –Manipur Violence : गोळीबारात दोन जण ठार; ७ जखमी)

आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रेत्यांनी टोमॅटोच्या किमतीत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांनाच टोमॅटोसाठी प्रतीकिलो १० रुपये मिळाले. तर वाहतूक खर्च गृहित धरता त्यांना टोमॅटो बाजारात पोहोचवेपर्यंत किलोमागे आणखी ३ रुपये खर्च होतील. आणि हे सगळं धरून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होईल, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे फक्त टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांच्या किमतीतही सरकारने हस्तक्षेप कऱण्याची मागणी होतेय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.