शार्लेट तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन पर्यटक बुडाले ही माहिती समोर येताच माथेरान (Matheran) पोलीस व माथेरान सह्याद्री रेस्कू टीम ने शोध मोहीम सुरु केली. शार्लेट तलावातं पोहण्यास सक्त मनाई असताना देखील पाण्यात जाऊन तरुणांनी आपला जीव गमावला आहे. (Matheran)
हेही वाचा-Medical Hospital : धर्मादाय रुग्णालयांना शासनाची नियमावली
सह्याद्री आपत्कालीन बचाव पथकासह खोपोलीचे एक पथकही रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (वय १९) आणि फिरोज शेख (वय १९) अशी त्यांची नावे आहेत. (Matheran)
हेही वाचा- Crime : अमेरिकाचा व्हिसा नाकारल्याने बॉम्बची धमकी, तरुणाचा शोध सुरू
पिसरनाथ मंदिरात दर्शन घेऊन ते जवळच्या शार्लोट लेकवर गेले. तेथे तलावाच्या काठावर मौजमजा करता करता त्यांच्यापैकी एक तरुण पाय घसरून तलावात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी काहींनी तलावात उड्या घेतल्या. त्यापैकी दोघांनी बुडणाऱ्या तरुणाचा हात पकडला. मात्र त्याच्याबरोबर तेही बुडाले. (Matheran)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community