Hindu : हिंदू मुलाशी लग्न केल्याने मुस्लिम मुलीला धमक्या; सीएम योगी आणि बागेश्वर बाबांना केले आवाहन

पिडीत तरुणीने एक व्हिडीओ प्रसारित करत कुशीनगर जिल्ह्यातल्या रविंद्रनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

109

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर जिल्ह्यामध्ये मुस्लिम मुलगी घरी परतली आणि एका हिंदू मुलाशी लग्न केले. मात्र, आता त्या तरूणीने पोलिसांवर तिचा आणि पतीच्या कुटुंबियांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच मुलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पिडीत तरुणीने एक व्हिडीओ प्रसारित करत कुशीनगर जिल्ह्यातल्या रविंद्रनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. ६ मिनिटे २७ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तरुणीने सांगितले आहे की, मी मुस्लिम होती आणि पळून जाऊन एका हिंदू मुलाशी लग्न केले. आता माझा हिंदू धर्माशी विवाह झाला आहे. आता मी हिंदू धर्माचा स्विकार केला आहे. परंतू रविंद्रनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर मला त्रास देत आहेत. मुस्लिम मुलगी हिंदू धर्म स्वीकारू शकत नाही, असे ते म्हणत आहेत. मी सनातन धर्मात का जाऊ शकत नाही?, मला रोखणारे हे कोण आहेत?, असा प्रश्न पिडीत तरुणीने उपस्थित केला आहे.

(हेही वाचा Muslim : हिजाबची सक्ती आणि धर्मांतर करणाऱ्या ‘या’ राज्यातील शाळांवर चालणार बुलडोझर )

पिडीत तरुणी पुढे म्हणाली, माझ्या कुटुंबीयांकडून पैसे घेऊन ते मला थांबवत आहेत. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे, मी ‘जय श्री राम’चा नारा देत आहे आणि यापुढेही देत ​​राहीन, तुम्हाला जे करायचे ते करा. मी यूपीची आहे, पोलीस मला थांबवत आहेत, योगीजी कुठे आहेत, ते मला साथ देणार नाहीत का? बागेश्वर बाबा कुठे आहेत, ते खूप प्रसिद्ध आहेत, ते मला मदत करणार नाहीत का?, असेही सवाल करत आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल वाचा फोडली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.