Ayodhya : अयोध्येत उभारणार जगातील पहिले संपूर्ण शाकाहारी सप्त तारांकित हॉटेल

आता नवा भारत, नवा उत्तर प्रदेश आणि नवी अयोध्या दिसणार आहे.

193

जगातील पहिले सप्त तारांकीत शाकाहारी हॉटेल अयोध्यामध्ये (Ayodhya) उभारण्यात येणार आहे. जगात कुठेही असे हॉटेल सापडणार नाही जे पूर्णपणे शाकाहारी आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. आता नवा भारत, नवा उत्तर प्रदेश आणि नवी अयोध्या दिसणार आहे.

(हेही वाचा Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठाला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे का? अखेर पुरीच्या शंकराचार्यांनी केला खुलासा )

अयोध्येमध्ये  (Ayodhya) २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी देशभरासह जगभरातून हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. या विमानतळातील जुनी धावपट्टी 167 एकरांवर पसरलेली असून ती निरुपयोगी होती. सरकारी विमानही तिथे उतरू शकले नाही. विमानतळ प्राधिकरणाला 821 एकर जमीन कालमर्यादेत उपलब्ध करून दिली, त्यानंतर हे काम वेगाने झाले. आता नवीन विमानतळामुळे सर्व दिशांनी अयोध्येला  (Ayodhya) पोहोचणे सोपे झाले. अयोध्येला फोर लेन आणि सिक्स लेन कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. लखनौ ते अयोध्या, गोरखपूर ते अयोध्या, प्रयागराज ते अयोध्या, वाराणसी ते अयोध्या. शहरात सुलभ रस्तेही बांधण्यात आले आहेत. अयोध्येत फोर लेन आणि सिक्स लेन कनेक्टिव्हिटी झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.