केंद्र सरकारचे CGHS सॉफ्टवेअर ‘या’ तारखेपासून वापरासाठी होणार उपलब्‍ध

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांसाठी (CGHS) Android आणि iOS या दोन्ही मोबाइल ॲप्लिकेशन्समधील वापर प्रणाली (इंटरफेस) आणि एकात्मिक डिजिटल सेवांमधे सुधारणा करून त्याचा पुनश्च करणार आरंभ.

78
केंद्र सरकारचे CGHS सॉफ्टवेअर 'या' तारखेपासून वापरासाठी होणार उपलब्‍ध

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS), ही एक प्रमुख योजना असून त्यातील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) अद्ययावत करून त्यात मोठे डिजिटल परिवर्तन आणले जात आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक,C-DAC) द्वारे विकसित केलेला, हा सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म 28 एप्रिल 2025 पासून थेट उपलब्ध होणार आहे.

सुसंबद्धपणे याची कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी, कल्याण केंद्रांमधील सर्व CGHS सेवा 26 एप्रिल 2025 (शनिवार) रोजी एक दिवसासाठी बंद राहतील. डेटा स्थलांतर, स्विच-ओव्हर उपक्रम आणि अंतिम प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी ही व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याची आवश्यकता आहे.

(हेही वाचा – Worker Bhushan Award : विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ जाहीर)

CGHS HMIS मधील प्रमुख सुधारणा आणि तांत्रिक प्रगती

1. लाभार्थ्यांची पॅन-आधारित विशिष्ट ओळख

2. एकात्मिक डिजिटल सत्यापन आणि योगदानाचा पाठपुरावा

3. रक्कम भरण्यापूर्वी अर्जांची छाननी

4. कार्डातील बदल ऑनलाइन पध्दतीने करता येणे

5. रिअल-टाइम ऍप्लिकेशन ट्रॅकिंग आणि अलर्ट

6. अनिवार्य पासवर्ड पुन्हा बदलता येणे आणि सुरक्षित प्रवेश

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द करण्यावर अतिरिक्त भार न आकारण्याचे सरकारचे निर्देश )

CGHSचे अधिकृत मोबाइल ॲप्स अद्ययावत केले गेले आहे आणि आता ते लाभार्थींना उत्तम अनुभव देतील :
  • डिजिटल रीतीने CGHS कार्ड वापरता येणे
  • रिअल-टाइम स्थिती ट्रॅकिंग
  • आवश्यकता भासल्यास रुग्ण विशेषज्ञांकडे सुपूर्द करणे आणि डॉक्टरांची सल्ल्यासाठी वेळ निश्चित करणे(ई-रेफरल्स आणि अपॉइंटमेंट शेड्युलिंग)
  • मदतीसाठी आस्थापना अधिकाऱ्यांच्या (एडी) कार्यालयांचे एकत्रित संपर्क क्रमांक

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack नंतर सामाजिक माध्यमांवर धर्मांधांनी गाठली असंवेदनशीलतेची परिसीमा)

पूर्वीच्या व्यवस्थेचे निष्प्रभीकरण (लेगसी सिस्टम) आणि संकेतस्थळाचे स्थलांतर
  • नवीन साॅफ्टवेअरचे काम सुरू झाल्यानंतर 28 एप्रिल 2025 पासून, जुन्या CGHS वेबसाइट www.cghs.gov.in आणि www.cghs.nic.in या निष्क्रिय केल्या जातील. सर्व सेवा आणि माहिती यापुढे www.cghs.mohfw.gov.in यानवीन युनिफाइड CGHS डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल केली जाईल.
  • लाभार्थ्यांना या नवीन पोर्टलद्वारेच नोंदणी, अर्ज, तक्रार निवारण आणि माहिती पुनर्प्राप्ती यासह सर्व ऑनलाइन सेवांमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लाभार्थी आणि विभागांसाठी दिशानिर्देश
  • एप्रिलपासून, CGHS योगदान फक्त CGHS वेबसाइटवर असेल म्हणजे www.cghs.mohfw.gov.in/www.bharatkosh.gov.in वर उपलब्ध असलेली प्रत्यक्षरीत्या रक्कम भरण्याची विद्यमान प्रक्रिया 28 एप्रिल 2025 पासून बंद होईल.
  • CGHS सेवांसाठीचे अर्ज प्रगतीपथावर आहेत परंतु 27 एप्रिल 2025 पर्यंत पैसे भरले नाहीत तर ते रद्दबातल ठरतील आणि नवीन पोर्टलवर नव्याने अर्ज करावा लागेल.
  • CGHS हेल्पडेस्क आणि वापरकर्ता नियमावली CGHS वेबसाइट www.cghs.mohfw.gov.in आणि विभाग आणि लाभार्थ्यांच्या वापरासाठी मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.