-
खास प्रतिनिधी
राज्यातील भिकाऱ्यांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने भिक्षागृहातील भिकाऱ्याला देण्यात येणाऱ्या मेहनतानाच्या रकमेत भरीव वाढ केली. त्यांना आता महिन्याला पाच रुपयांऐवजी दिवसाला ४० रुपये मेहनताना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पण यामुळे राज्यातील भिकाऱ्यांचे प्रमाण कमी होईल का? असा सवाल केला जात आहे. (Daily Wage)
सर्वाधिक भिकारी कोणत्या राज्यात?
२०११ च्या जनगणना आकडेवारीनुसार देशात ४ लाख १३ हजार ६७० भिकारी असून सर्वाधिक भिकारी हे पश्चिम बंगाल या राज्यात आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८१,२४४ भिकाऱ्यांची संख्या असून ३३,०८६ पुरुष असून ४८,१५८ महिला भिकारी आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ६५,८३५, त्यानंतर आंध्र प्रदेश (३०,२१८), बिहार (२९,७२३), मध्य प्रदेश (२८,६९५), राजस्थान (२५,८५३) आणि त्यानंतर महाराष्ट्र २४,३०७ असा क्रम आहे. (Daily Wage)
भिकाऱ्याचे सरासरी उत्पन्न किती?
महाराष्ट्रातील २४,३०७ भिकाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. यात १४,०२० पुरुष आणि १०,२८७ महिला भिक्षेकरी आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका भिकाऱ्याचे सरासरी उत्पन्न रुपये ९०० ते ३,००० इतके असून महिन्याचे उत्पन्न लाखाच्या घरात जाते. काही अपवादात्मक प्रमुख ठिकाणी भीक मागणाऱ्यांचे उत्पन्न काही कोटीत गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्य शासन महिन्याला जो मेहनताना देते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई भीक मागून होते. यामुळेच भिक्षागृहात मेहनत करण्यापेक्षा बाहेर भीक मागणे सोयीचे असल्याने भिकारी भिक्षेगृहात जाण्यास अनुत्सुक असतात, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (Daily Wage)
भीक मागण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या भिक्षागृहातील व्यक्तिचे पुनवर्सन करण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या कामासाठी दररोज ४० रुपये मेहनताना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (Daily Wage)
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; WAVES Summit 2025 चे करणार उद्घाटन)
शासनाचे प्रयत्न यशस्वी होतील?
भीक मागणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी १४ भिक्षेकरी गृह सुरु आहेत. या भिक्षेकरी गृहात ४ हजार १२७ इतक्या व्यक्तिंचे पुनर्वसन करण्यात येते. या संस्थेत दाखल झालेल्या व्यक्तिला भिक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा याकरिता शेती तसेच लघु उद्योगांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. असे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तिला यापुर्वी दरमहा पाच रुपये इतका मेहनताना देण्यात येत असे. हा मेहनताना आता दररोज चाळीस रुपये करण्यात येणार आहे. यातून भीक मागण्याची वृत्ती कमी होऊन, अशा व्यक्तिंना कामाची गोडी लावता येणार आहे. या निर्णयामुळे भिक्षेकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले. (Daily Wage)
१९६४ च्या कायद्यात बदल
आतापर्यंत १९६४ पासून भिक्षागृहांतील भिकाऱ्यांना दरमहा पाच रुपये मेहनताना दिला जात असे. भीक मागण्याची वृत्ती कमी व्हावी, या उद्देशाने राज्यात महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध कायदा १९६४ पासून अस्तित्वात आहे. त्या अंतर्गत राज्यात भीक मागणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी १४ भिक्षेकरी गृह सुरु आहेत. (Daily Wage)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community