मुंबईत लवकरच Water Metro; दक्षिण मुंबईतून ४०-५० मिनिटांत वसई!

72
मुंबईत लवकरच Water Metro; दक्षिण मुंबईतून ४०-५० मिनिटांत वसई!
  • खास प्रतिनिधी 

दक्षिण मुंबईतून वसईला जाण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागतात. मात्र पुढील दोन वर्षात हा वेळ अर्ध्याने कमी होणार आहे. राज्य सरकार कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबई महानगरात ‘वॉटर मेट्रो’ (Water Metro) सुरू करणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील मीरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, त्याचबरोबर कल्याण ते वसई प्रवासासाठी एक तास ४० मिनिटांचा अवधी लागतो. वॉटर टॅक्सीने ३५ ते ४५ मिनिटांत हा प्रवास होऊ शकतो.

कोची वॉटर मेट्रोची मदत

कोची वॉटर मेट्रो (Water Metro) प्रकल्पाचे एक शिष्टमंडळ नुकतेच मुंबईत दाखल झाले होते. या शिष्टमंडळाने दिलेल्या अहवालावर राज्य शासन वॉटर मेट्रो प्रकल्पाची तयारी सुरू करत असल्याचे समजते. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मदतीने वॉटर मेट्रो प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकल्प मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

(हेही वाचा – ‘धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप नाही…’ वक्फ कायद्यावर केंद्र सरकारने Supreme Court मध्ये प्रतिज्ञापत्र केले दाखल)

१५ जेट्टी उभारणार

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेशात जेट्टी उभारण्यासाठी २१ जागा निवडण्यात आल्या असून पहिल्या टप्प्यात १५ जेट्टी उभारण्याचा संकल्प आहे. वॉटर मेट्रोसाठी ९ मार्ग निश्चित करण्यात आले असून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वॉटर मेट्रो (Water Metro) प्रकल्पामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वसई ४०-५० मिनिटांत

सध्याची परिस्थिती लक्षात दक्षिण मुंबईतून वसईला पोहचण्यासाठी दोन तासांहून अधिक काळ लागतो. मात्र वॉटर टॅक्सीमुळे (Water Metro) साधारण ४० ते ५० मिनिटांत हा प्रवास शक्य असल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे नारंगी-खार वाडेश्वरी, वसई-मिरा भाईंदर-फाऊंटन जेट्टी-गायमुख-नागळे, कोलशेत-कल्हेर-मुंब्रा-कल्याण, कल्याण-मुंब्रा-मुलुंड-ऐरोली-वाशी-डीटीसी-गेटवे ऑफ इंडिया, मुलुंड-ऐरोली-डीटीसी-गेटवे, मिरा भाईंदर-वसई-बोरिवली नरिमन पॉईंट-मांडवा, बेलापूर-गेटवे-मांडवा बोरिवली गोराई नरिमन पॉईंट असे अन्य मार्ग असतील, अशी प्राथमिक माहिती आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.