Gadchiroli : नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या कटेझरी या अतिदुर्गम गावात २६ एप्रिलला लालपरी म्हणजेच एसटी बस सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या सहकार्यामुळे सुरू झालेल्या या लालपरीचे वाजत गाजत गावकऱ्यांनी स्वागत केले. (Gadchiroli)
आज दिनांक 26/04/2025 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने मौजा कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरू करण्यात आली. गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमतः बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी वाजत गाजत बसचे स्वागत केले. #FirstBusToKatezari pic.twitter.com/AcnC43eXCc
— गडचिरोली पोलीस – GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) April 26, 2025
स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी पहिल्यांदाच कटेझरी ते गडचिरोली बससेवा (Katezari to Gadchiroli ST Bus) सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या (Gadchiroli Police Force) प्रयत्नांमुळे ही सेवा शक्य झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे (Jagdish Pandey) यांनी बससेवेचे उद्घाटन केले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बससेवेमुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या-जाण्याची सोय होणार आहे.
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana च्या २१०० रुपयांचे काय झाले ?; मंत्री झिरवळ म्हणाले…)
तसेच यापूर्वी १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा ते गर्देवाडा आणि वांगेतुरी बससेवा सुरू करण्यात आली होती. मागील पाच वर्षांत दुर्गम भागात ४३४.५३ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते आणि ५९ पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community