Nashik Paper Leak Case : परीक्षेआधीच केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटली; आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तातडीने उपाययोजना

कुलगुरुंच्या आदेशानुसार राज्यातील ५० परीक्षाकेंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग दोन विषयाचा दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

125
Nashik Paper Leak Case : परीक्षेआधीच केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटली; आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तातडीने उपाययोजना
Nashik Paper Leak Case : परीक्षेआधीच केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटली; आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तातडीने उपाययोजना

अनावधानाने अगोदरच उघडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेसाठी विद्यापीठाकडून तातडीने उपाययोजन करण्यात आली आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-२०२३ सत्राच्या लेखी परीक्षा दि २८ ऑक्टोबर २०२३ ते ०८ नोव्हेंबर २०२३ कालावधीत घेण्यात येत आहेत. राज्यभरातील पन्नास परीक्षा केंद्रांवर या परीक्षा सुरु आहेत. (Nashik Paper Leak Case)

त्यांनी पुढे सांगितले की, दि. ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी एका परीक्षाकेंद्रावर अनवधानाने एम. बी. बी. एस-२०१९ च्या अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री भाग एक विषयाऐवजी बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाची प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाची परीक्षेचे आयोजन दि. ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. सदर बाब लक्षात येता विद्यापीठाने तातडीने उपाययोजना केली. कुलगुरुंच्या आदेशानुसार राज्यातील ५० परीक्षाकेंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग दोन विषयाचा दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. (Nashik Paper Leak Case)

(हेही वाचा – Air pollution : हवा प्रदुषणामुळे वाहतूक पोलिसांचे आरोग्य धोक्यात)

तातडीच्या प्रश्नपत्रिका बदलण्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टाळण्यात आला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही करण्यात आली होती. एम. बी. बी. एस-२०१९ च्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेकरीता राज्यभरातील एकूण ८३९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठामार्फत चौकशी करण्यात येत आहे. (Nashik Paper Leak Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.