Samyukta Maharashtra : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची दुरवस्था… दर्शनी भागच दर्शवतो प्रशासनाचे दुर्लक्ष!

187
Samyukta Maharashtra : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची दुरवस्था... दर्शनी भागच दर्शवतो प्रशासनाचे दुर्लक्ष!
Samyukta Maharashtra : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची दुरवस्था... दर्शनी भागच दर्शवतो प्रशासनाचे दुर्लक्ष!
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळायलाच पाहिजे, असा नारा देत पुकारलेल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या लढ्याच्या स्मृती पुढील पिढीच्या स्मरणात चिरंतन राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे उभारलेल्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाला ३० एप्रिल रोजी १५ वर्षे पूर्ण झाली. परंतु आज या कला दालनाची दुरवस्था झाली असून कला दालनात प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला गळती लागलेली आहे, काही ठिकाणी पीओपी शिट निखळलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाशेजारी संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती सन २००९-१० मध्ये हाती घेवून ३० एप्रिल २०१० मध्ये याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच हे कलादालन उभारण्यात आले. यासाठी स्वतंत्र निविदा न काढता प्रशासनाने येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाच्या बांधकामांच्या कंत्राट कामांमध्ये याचा समावेश करत बी.जी. शिर्के यांच्याकडून हे काम करून घेतले होते. त्यामुळे ज्या शिवसेनेने नियमबाह्य काम देत या कलादालनाची उभारणी केली, त्याच कलादालनाकडे ना शिवसेनेचा लक्ष आहे ना महापालिकेचा आणि नाही राज्य सरकारचा. (Samyukta Maharashtra)

(हेही वाचा – Pahalgam Terror Update : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पंजाबमध्ये हाय अलर्ट, सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम करणार तैनात)

मागील १५ वर्षातील जर आढावा घेतला तर मागील काही महिन्यात शालेय विद्यार्थी सोडले तर बाहेरचे दिवसाला एखाद दुसरा पर्यटक भेट देत असतो. हे कलादालन महाराष्ट्र लढ्याचा इतिहास दर्शवणारी वास्तू ऐवजी वाहन तळ म्हणूनच अधिक प्रसिद्ध होत आहे. याठिकाणी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आंतर राष्ट्रीय तरण तलावात पोहायला येणाऱ्यांची वाहनेच याठिकाणी उभी केली जातात. त्यामुळे वाहनतळ म्हणून या कला दालनाचा परिसर नागरिकांना ज्ञात असून संयुक्त महाराष्ट्राचे कला दालन याठिकाणी आहे याबाबत महापालिका प्रशासनाकडून जनजागृती केली जात नाही. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी या कलादालना देखभाली बाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली होती. त्यात त्यांना याची देखभाल उद्यान पायाभूत सुविधा कक्षा कडे नसून जी उत्तर विभागाकडे असल्याची माहिती दिली होती. मात्र, राज्यात १ मे मोठ्या दिमाखात साजरा केला जात असताना तसेच दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर या दिनाचे औचित्य साधून संचालन आणि कार्यक्रम केले जात असताना हे कलादालन उपेक्षितच आहे. या कलादालनाच्या बाह्य बाजूला केलेली विद्युत् रोषणाई ही सुद्धा शेवटची घटका मोजताना दिसत आहे. पण याकडेही महापालिका प्रशासनाचे लक्ष दिसून येत नाही. (Samyukta Maharashtra)

या कलादालनाची वास्तू एक मजल्याची आहे. तळ मजल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी छायाचित्रे, शिल्पाचे तसेच माहितीचे फलक आहेत. याशिवाय याच तळमजल्यावर चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी व माती असलेले कलश आहे. याबरोबरच भारत मातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातील लोककलेची शिल्पाकृती आदींची मांडणी करण्यात आली आहे. तर पहिल्या मजल्यावर गडकिल्ल्यांचे, लेण्यांचे, देवस्थांनाची व पर्यटनस्थळांचे विहंगम दृश्य तसेच लोककला व संस्कृती व प्राचीन शिल्पे दर्शवण्यात आली आहे. (Samyukta Maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.