Cheque : एकाच दिवसात धनादेश वटण्याच्या योजनेचा उडाला बोजवरा

भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यात धनादेश वटविण्याचा कालावधी कमी करण्याचे जाहीर केले. त्याच्या पहिल्या टप्प्यास ४ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली.

170
धनादेश देताना व्यक्तीचा हात
धनादेश देताना व्यक्तीचा हात दर्शवित आहे.

एका दिवसात धनादेश (Cheque)  वटवून खात्यात पैसे जमा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुरती कोलमडली आहे. अंमलबजावणीस तीन सप्ताह उलटूनही प्रणाली सुरळीत झाली नाही. पूर्वी धनादेश भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी पैसे खात्यात जमा होत होते. आता त्यास सहा दिवस लागत आहेत. धनादेश (Cheque) देणाऱ्या खात्यातून पैसे कापले जात आहेत. मात्र, संबंधिताला पैसे जमा होत नसल्याने धनादेशाची आणि व्यापाऱ्याची पतही धोक्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यात धनादेश वटविण्याचा कालावधी कमी करण्याचे जाहीर केले. त्याच्या पहिल्या टप्प्यास ४ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. यात बँकेत जमा झालेल्या धनादेशाचे पैसे त्याच दिवशी संबंधिताच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तर, ३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात हा कालावधी काही तासांपर्यंत कमी होणार आहे. पुरेशी तयारी न करता सुरू केलेला पहिलाच टप्पा पुरता कोलमडला आहे. अगदी सहा ऑक्टोबर रोजी भरलेल्या धनादेशाचे (Cheque) पैसेही अनेकांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दिवळीच्या हंगामातच हा घोळ झाल्याने व्यापाऱ्यांना नवीन मालाची मागणी नोंदविताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

(हेही वाचा ‘Pakistan भारताविरोधात युद्ध जिंकूच शकत नाही’; माजी सीआयए अधिकाऱ्याचे वक्तव्य)

धनादेश (Cheque) दिलेल्या व्यक्तींच्या खात्यातून पैसे कापले जात आहेत. मात्र, ज्यांच्या खात्यात पैसे जमा होणे आवश्यक आहे, त्यांना पैसे क्रेडिट केले जात नाहीत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक बँकांनी संबंधितांना ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा देऊ केली आहे. चलन-वलनावर व्यापार चालत असतो. ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले गेले पण खात्यात पैसे जमाच झाले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना माल कसा खरेदी करायचा, असा प्रश्न पडत आहे. व्यापाऱ्यांना त्यांची पत टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मालाचे पैसे दुसऱ्या दिवशी जमा झाल्यास दोन ते तीन टक्क्यांपर्यंत सवलत मिळते, धनादेश सहा ते पंधरा दिवस वटतच नाहीत. त्यामुळे या सवलतीवर पाणी सोडावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  (Cheque)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.