Turkistan च्या विरोधात फास आवळण्यास सुरुवात; भारतीय मुत्सद्देगिरीला यश

58
Turkistan च्या विरोधात फास आवळण्यास सुरुवात; भारतीय मुत्सद्देगिरीला यश

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सुरु केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला सक्रिय मदत केल्याची किंमत तुर्कस्तानला (Turkey) भोगावी लागत आहे. भारताने तुर्कस्तानशी (Turkey) असलेले सर्व व्यापारी संबंध तोडायला सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तुर्कस्तानला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याचाच परिणाम म्हणून तुर्कस्तानच्या विरोधात फास आवळायला आता सुरुवात झाली आहे. (Turkistan)

भारताने सर्वच क्षेत्रांत दिला तडाखा

भारत आणि तुर्कस्तान यांच्यातील व्यापार मोठा आहे. तुर्कस्तान हा भारताला सफरचंद निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. याशिवाय भारतीय पर्यटकांचे तुर्कस्तान हे आवडते ठिकाण आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला मदत केल्यामुळे भारतात तुर्कस्तानविरोधी मत तयार झाले आहे. पुण्यातील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानकडून सफरचंद विकत न घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे तुर्कस्तानल तब्बल १२०० कोटींचे नुकसान होणार आहे. राजस्थानमध्येही तुर्कस्तानच्या विरोधात वातावरण तयार झालेले असून उदयपूर मार्बल प्रोसेसर्स असोसिएशनने तुर्कस्तानकडून आयात मार्बल न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुर्कस्तानला जवळपास २५०० ते ३००० कोटींचा फटका बसू शकतो. (Turkistan)

(हेही वाचा – गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता Sanatan च्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात; डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन)

भारतीय पर्यटन व्यवसायाने टाकला तुर्कस्तानवर बहिष्कार

भारतीय पर्यटन उद्योगाचा तुर्कस्तानमधील अर्थव्यवस्था वाढीमध्ये मोठा वाटा आहे. दरवर्षी जवळपास ३ लाख भारतीय पर्यटक तुर्कस्तानला भेट देतात. एकट्या भारतीय पर्यटकांमुळे तुर्कस्तानमध्ये २९१.६ मिलियन डॉलर्सची उलाढाल होते. भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानची सगळी बुकिंग्स रद्द करायला सुरुवात केली आहे. भारतीय पर्यटन कंपन्यांनी सुध्दा तुर्कस्तानच्या सर्व सहली रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताच्या अजून एका मोठ्या व्यवसायाने तुर्कस्तानकडे पाठ फिरवली आहे. (Turkistan)

भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तुर्की कंपन्यांची भागीदारी रद्द करण्याची नियमावली करण्यासाठी गळ

भारतीय प्रमुख विमानसेवा कंपनी एअर इंडियाने भारतात सेवा पुरविणाऱ्या सर्व विमान कंपन्यांना त्यांची तुर्की कंपन्यांशी असलेली भागीदारी रद्द करावी अशी मागणी केली आहे. भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयाने याबद्दल नियमावली जाहीर करण्याची विनंती केली आहे. तुर्कस्तानसाठी हा फार मोठा धक्का असू शकतो. (Turkistan)

(हेही वाचा – India A Team to England : अभिमन्यू ईश्वरन भारतीय अ संघाचा कर्णधार; ध्रुव जुरेल उपकर्णधार)

तुर्कस्तानची प्रतिक्रिया

तुर्कस्तानकडून यावर अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी तुर्कस्तानच्या पर्यटन मंत्रालयाने भारतीय पर्यटकांना विनवणी करणारे पत्रक जाहीर केले आहे. कितीही झाले तरी याचा तुर्कस्तानला मोठा फटका बसणारच आहे. तुर्कस्तान भोवती आता फास आवळायला सुरुवात झाली आहे. आता तुर्कस्तानला जबर किंमत मोजावी लागणार हे निश्चित. (Turkistan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.