मराठा आंदोलन पुन्हा पेटले; राज्यभर पडसाद उमटले

95
सुशांत सावंत
मराठा समाजाला त्याच्या सर्वांगीन विकासासाठी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २ वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने राज्यभर मोर्चे काढल्यानंतर मिळालेल्या आरक्षणाचा लाभ मिळून वर्ष नाही होत तोच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यातच राज्य सरकारने पोलीसभरतीचे आदेश दिल्याने संतापलेल्या मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्र घेतला असून आज दिवसभर राज्यभर ठिकठिकाणी मराठा समाजाच्या विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
solapur
रविवारी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर सोमवारी राज्यभर पसरले. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच सोलापूरमध्ये देखील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको करत टायर जाळले. सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस  बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकात पोलिसांचे पथक उभे करण्यात आले आहे. पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलने सुरु राहतील. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दडपशाही करत आहेत असा आरोप आंदोलक करत आहेत.
मुंबईत १८ ठिकाणी झाली आंदोलने 
दरम्यान रविवारी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेत मुंबईत ठिय्या आंदोलन केले होते. मुंबईतील जवळपास १८ ठिकाणी हे आंदोलन केले असून, लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. प्लाझा सिनेमा,  भारतमाता टॉकीज, शिवाजीराजे पुतळा, पांजरपोळ, चेंबूर, वरळी नाका, वरळी, गिरगाव चर्च, कलानगर जंक्शन, वांद्रे, सांताक्रुज विमानतळ, पश्चिम दृतगती मार्ग, जोगेश्वरी  रेल्वे स्थानक, शामनगर तलाव, दहिसर रेल्वे स्थानक, शिवाजी चौक, वडाळा, संगमेश्वर मंदिर, कुर्ला, साईबाबा मंदिर, मानखुर्द, मराठी विद्यालय, पंतनगर, घाटकोपर, गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर, शिवाजी महाराज पुतळा, कन्नमवार नगर-२, विक्रोळी, आयआयटी गेट समोर,पवई, शिवाजी तलाव,भांडुप  ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे
कोल्हापुरात 23 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत.
पोलीसभरती थांबवा 
न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असताना राज्य सरकारने पोलीस भरती का सुरु केली? या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजप म्हणते की, त्यांनी सुप्रीम कोर्टात टिकेल असे आरक्षण दिले होते. मग ते सुप्रीम कोर्टात का टिकले नाही, ही फक्त टोलवाटोलवी आहे, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.