समृद्धी महामार्गावरील आमने नोड बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसित होणार; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन

64
समृद्धी महामार्गावरील आमने नोड बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसित होणार; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावरील आमने नोड येत्या काळात बीकेसी आणि नोएडाप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार आहे. या भागातील नाशिक महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्याय शोधण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आमने नोडच्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले.

या बैठकीला शिक्षणमंत्री दादा भुसे, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव दशपुते आदी उपस्थित होते.

(हेही वाचा –पाकिस्तान जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारे दुष्ट राष्ट्र; भारताचे United Nations परिषदेत खडे बोल)

आमने नोड हा ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असून, भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून त्याचा विकास होणार आहे. १०,७९१ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या नोडमध्ये इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टिक हब, ॲग्रीकल्चर हब, फूड प्रोसेसिंग पार्क आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले. नाशिक महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासह वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. या कामाच्या प्रगतीसाठी नोडल अधिकारी नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले. तसेच, आमने नोडमार्गे नाशिक, मनोर-वाडा रस्ता आणि जेएनपीएकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश दिले. यासाठी अवजड वाहनांसाठी वेळेचे नियमन आणि ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आमने नोडच्या विकासामुळे या भागात औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळण्याबरोबरच वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे होण्याची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशांमुळे या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.