Most Dry August In 120 Years : यंदाच्या ऑगस्टमध्ये गेल्या १२० वर्षांतील सर्वात कमी पाऊस

179
Most Dry August In 120 Years : यंदाच्या ऑगस्टमध्ये गेल्या १२० वर्षांतील सर्वात कमी पाऊस
Most Dry August In 120 Years : यंदाच्या ऑगस्टमध्ये गेल्या १२० वर्षांतील सर्वात कमी पाऊस

यंदाचा पावसाळा संपत आला आहे. तरीही अनेक जिल्हे अजूनही कोरडेच आहेत. (Most Dry August In 120 Years) भारतात जून ते सप्टेंबर हे ४ महिने मान्सूनचे असतात. 75 टक्के मान्सून संपला आहे. यावेळी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा 11 टक्के कमी पाऊस झाला आहे. गेल्या ३ महिन्यात ऑगस्ट सर्वात कोरडा गेला. दरवर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा 36 टक्के पाऊस कमी झाला आहे, तसेच तो गेल्या 120 वर्षांतील कोरडा ऑगस्ट ठरला आहे.

बिहार, झारखंड, छत्तीसगढ, कर्नाटक, मणिपूर, केरळ, मिझोराम, दादरा-नगर-हवेली, दमण आणि दिव या ९ प्रदेशांत सर्वात कमी पाऊस झाला आहे. ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे २० टक्के ते ४७ टक्के पाऊस कमी झाला आहे. दमण आणि दिव येथे तर सरासरीच्या ८० टक्के कमी झाला. दादरा-नगर-हवेली येथे १०० टक्के कमी झाला आहे. पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांतही सरासरीच्या ६ ते २० टक्के कमी पाऊस झाला आहे.

(हेही वाचा – Bharat : ‘इंडिया’ शब्द हटवण्यासाठी सरकार विधेयक आणणार)

अल निनो सक्रिय झाल्यामुळे मान्सून कमकुवत

हवामानशास्त्रज्ञ वेद प्रकाश सिंह यांच्या मते, ऑगस्ट 2023 मध्ये भारतात पाऊस कमी होण्याची २ कारणे आहेत. अल निनो सक्रिय होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सूनचे वारे तितकेसे जोरात नव्हते. जेव्हा अल निनो सक्रिय होतो, तेव्हा भारतात मान्सून कमकुवत होतो. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत दुष्काळ पडतो. भारतात हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे सर्वाधिक पाऊस पाडतात. अल निनो हे मान्सून वारे कसे कमकुवत करतात, यावर शास्त्रज्ञ सखोल संशोधन करत आहेत. त्याचा प्रभाव कधी जास्त, तर कधी कमी असतो, पण प्रत्येक वेळी त्याचा वाईट परिणाम मान्सूनवर होतो. (Most Dry August In 120 Years)

मेट्रोलॉजी आणि क्लायमेट चेंज, स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी 2023 मध्ये 1991 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सामान्यपेक्षा १० टक्के कमी पाऊस असेल, तर हवामानशास्त्राच्या परिभाषेत त्याला सौम्य दुष्काळ किंवा मध्यम दुष्काळी वर्ष म्हणतात. जी.पी. शर्मा यांचे म्हणणे आहे की, यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चच्या हंगामातच कडक उन्हाची सुरुवात झाली. त्यामुळे अल निनो मजबूत होण्याची शक्यता वाढते. असे झाले तर आधीच पाण्याअभावी त्रस्त असलेल्या अनेक राज्यातील जनतेचा त्रास आणखी वाढू शकतो.

धान्य साठ्यावर थेट परिणाम होणार

1 जुलै 2023 पर्यंत सरकारी गोदामांमध्ये 71.1 दशलक्ष टन तांदूळ आणि गव्हाचा साठा होता. तो गेल्या 5 वर्षांतील सर्वात कमी आहे. सामान्य वर्षांमध्ये चांगले पीक अपेक्षित असताना आणि निवडणुका समोर नसताना एवढा धान्यसाठा पुरेसा असतो. परंतु यावेळी अल्प पावसामुळे उत्पादनही कमी राहण्याची शक्यता आहे आणि निवडणुकाही समोर आहेत. अशा परिस्थितीत कमी पाऊस झाल्याने धान्य साठ्यावर थेट परिणाम होणार हे निश्चित आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळाल्यास हा पैसा शेतकरी इतर कामात खर्च करतील. यामुळे बाजारपेठेतील समतोल राखला जाईल, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळाला नाही, तर महागाई गगनाला भिडू शकते. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. (Most Dry August In 120 Years)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.