Hyundai Creta 2024 : ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टसाठी तुम्ही तयार आहात का?

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टची वैशिष्ट्य आणि किंमत जाणून घेऊया. 

192
Hyundai Creta 2024 : ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टसाठी तुम्ही तयार आहात का?
Hyundai Creta 2024 : ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टसाठी तुम्ही तयार आहात का?
  • ऋजुता लुकतुके

ह्युंदाई कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल क्रेटाचं फेसलिफ्ट व्हर्जन मंगळवारपासून बाजारात येत आहे. कंपनीने २५,००० रुपयांच्या टोकनवर गाडीचं बुकिंग सुरू केलं आहे. आणि या गाडीची किंमत १०.९० लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. या गाडीचे एकूण सात व्हेरियंट सध्या उपलब्ध आहेत. आणि त्यांची सविस्तर माहिती कंपनीची वेबसाईट तसंच सोशल मीडियावर कंपनीने दिली आहे. (Hyundai Creta 2024)

एकावेळी पाच लोक बसू शकतील अशी ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. गाडीच्या व्हेरियंट नुसार त्यात १.५ क्षमतेचं पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असेल. तसंच स्पोर्ट्स मॉडेलमध्ये पेट्रोल टर्बो इंजिनही आहे. (Hyundai Creta 2024)

(हेही वाचा – Asus ROG Phone 8 Series : आसुसचे नवीन फोन आहेत गेमिंगसाठी खास)

या असतील सुविधा 

गाडीचं इंटिरिअर आणि बाहेरचा लुक यातही बरेच बदल करण्यात आले आहेत. नवीन क्रेटा फेसलिफ्टमध्ये डुआल झोन एसी बसवण्यात आलाय. तर चालकासमोरचा डिजिटल डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट डिस्प्ले हे १०.२५ इंचांचे आहेत. गाडीला पॅनोरमिक सनरुफ आहे. आणि वायरलेस फोन चार्जिंगची सुविधाही आहे. (Hyundai Creta 2024)

सुरक्षेसाठी या गाडीत सहा एअरबॅग्ज आहेत. तर चालकाला इशारा देणारी ॲडव्हान्स्ड सुरक्षा यंत्रणाही आहे. लेन बदलली, समोरच्या किंवा मागच्या गाडीत कमी अंतर असेल तर ही यंत्रणा चालकाला त्याबद्दल माहिती देते. तसंच हे अंतर ठरावीक मीटरपेक्षा कमी झालं तर आपत्कालीन ब्रेकही लावते. (Hyundai Creta 2024)

नवीन ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट गाडीची स्पर्धा असेल ती एमजी ॲस्टर, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन टायगन, मारुती ग्रँट व्हिटारा, होंडा एलिव्हेट, सिट्रॉन सीथ्री एअरक्रॉस आणि किया सेल्टॉस या गाड्यांशी. (Hyundai Creta 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.