-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोस्टल रोडनंतर गिरगाव चौपाटीचा (Girgaon Chowpatty) परिसर अधिक आकर्षक बनल्यानंतर या भागातील रोषणाई अधिक प्रखर आणि आकर्षक करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. रोषणाईसाठी बसविण्यात आलेले विद्यमान ९ नग ट्रायपॉड जीर्ण आणि गंजलेल्या अवस्थेत आहेत आणि कोसळण्याच्या मार्गावर ते सर्व बदलण्यात येणार आहेत. या विद्युत रोषणाईमुळे गिरगाव चौपाटीचा परिसर आता उजळून जाणार आहे.
(हेही वाचा – Israel-Iran war : भारताने व्यक्त केली चिंता; आमचे परिस्थितीवर लक्ष)
गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथील डॉ. एन. एन. पुरंदरे रोडवरील विद्युत रोषणाईसाठी बसवलेले ९ खांब हे गंजले असून ते आता कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यानुसार हे खांब बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी तात्पुरती केलेली सोय उपयोग ठरणार नसल्याने हे विद्युत खांब नव्याने बसवण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी पाटील इलेक्ट्रिकलची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात विशेषतः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि छठपूजा मध्ये प्रचंड गर्दीमुळे अतिरिक्त रोषणाई आवश्यक असते.
(हेही वाचा – Nair Hospital मध्ये सलग २१ वर्ष रक्तदान शिबिर; यंदा तब्बल ७१ जणांनी केले रक्तदान)
तसेच हे खांब गंजल्याने कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने ते बदलण्याचा निर्णय घेतला. बेस्ट विभागाच्या पथदिवे विभागाचे अधिक्षक, डि विभागाचे अभियंता यांनी गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे एकत्रित पाहणी केली. त्यावेळी विद्यमान ट्रायपॉड जीर्ण अवस्थेत आहेत आणि त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे. गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आणि छठपूजा दरम्यान सार्वजनिक गर्दी लक्षात घेता, ट्राय पॉडस त्वरीत कार्यक्षम रेडिएन्स सिस्ट्म मास्टसह बदलणे आवश्यक असल्याची बाब समोर आली. या विद्युत रोषणाईमुळे गिरगाव चौपाटीचे सौंदर्य वाढेल, योग्य एक समान रोषणाई असेल आणि रोषणाईचे अधिक क्षेत्र व्यापेल, योग्य एक समान रोषणाई असेल आणि रोषणाईचे अधिक क्षेत्र व्यापेल, तसेच टांगलेल्या तारा आणि स्विचगियर्स नसलेल्या स्थापित खांबांची संख्या कमी होईल तसेच यावरील हे देखभाल खर्च कमी होईल आणि यामुळे गर्दीचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे सोपे होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community