Jogeshwari Vikhroli Metro Line : मेट्रो मार्गिकेचा अडसर दूर: ४५ बांधकामांवर कारवाई

जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्याच्या पूर्व बाजूने पश्चिम बाजुला जाण्याचा मार्ग मोकळा

164
Jogeshwari Vikhroli Metro Line : मेट्रो मार्गिकेचा अडसर दूर: ४५ बांधकामांवर कारवाई
Jogeshwari Vikhroli Metro Line : मेट्रो मार्गिकेचा अडसर दूर: ४५ बांधकामांवर कारवाई

मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागात जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता येथे बांधकाम निष्कासनाची मोठी कारवाई सोमवारी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडली. मेट्रो मार्गिका क्रमांक ६ मध्ये अडथळा ठरत असलेल्या ४५ बांधकामांवर कारवाई महानगरपालिका प्रशासनामार्फत तोडण्यात आले. या कारवाईमुळे मेट्रो प्रकल्पाचे काम वेग घेईल. तसेच परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठीही मदत होईल. विकास नियोजन रस्ता अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या रस्त्यासाठीही या तोडक कारवाईमुळे मदत होणार आहे. तसेच एसव्ही मार्ग ते लोखंडवाला आणि जवळपासच्या भागात पूर्व व पश्चिम प्रवासासाठीही या कामामुळे मोठा दिलासा मिळेल. (Jogeshwari Vikhroli Metro Line)

महानगरपालिका प्रशासनामार्फत सोमवारी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो मार्गिका सहाच्या कामासाठी कारवाई ही के-पश्चिम विभागामार्फत करण्यात आली. ओशिवरा पोलिसांच्या मदतीने एकूण ४५ बांधकामांवर निष्कासन तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ५० पोलिसांची मदत घेण्यात आली. तर महानगरपालिकेचे २५ कामगार, २ जेसीबी, १ पोकलेनचा वापर करण्यात आला. (Jogeshwari Vikhroli Metro Line)

(हेही वाचा – National Games Kho Kho : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खो खो संघांची आगेकूच)

अनेक प्राधिकरणांसह न्यायालयीन प्रकरणांमुळे ही कारवाई लांबणीवर पडले होते. मेट्रो मार्ग सहाच्या प्रकल्पाचे काम प्रलंबित होते. तसेच बांधकाम आणि रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. पावसाळी जलवाहिन्यांच्या मिसिंग लिंकमुळे या ठिकाणी झाल्यामुळे ड्रेनेजची मोठी समस्याही भेडसावत होती. या निष्कासन कारवाईमुळे आता परिसरातील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सदर प्रकल्पअंतर्गत पर्जन्य जलवाहिन्या आणि रस्त्याचे काम हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. इन्फिनिटी मॉल ते वीरा देसाई हा ३६.६० मीटर रुंदीचा विकास रस्ता रस्ता रुंदीकरणासाठी घेण्यात आला आहे. एकदा हा मार्ग पूर्ण झाल्यावर एसव्ही मार्ग ते लोखंडवाला आणि जवळपासच्या भागात पूर्व पश्चिम प्रवासासाठी मोठा दिलासा मिळेल. (Jogeshwari Vikhroli Metro Line)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो ६ मार्गिकेचा प्रकल्प हा जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याला समांतर पद्धतीने (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान) १४.१० किलोमीटर लांबीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. लिंक रोड ते एसव्ही मार्ग दरम्यान १२० फुटाचा १ किलोमीटरचा रस्तादेखील एमएमआरडीएमार्फत विकसित करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या भूखंडावरील ४५ बांधकामे निष्कासन कारवाई के-पश्चिम विभागामार्फत करण्यात आली. (Jogeshwari Vikhroli Metro Line)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.