Thane Water Shortage: ठाणेकरांनो बातमी तुमच्यासाठी; ‘या’ कारणामुळे बुधवारी पाणीपुरवठा राहणार बंद

76
ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील (Temghar Water Purification Center Thane) उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार ४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार, ०४ जून या दिवशी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० या काळात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद (Water supply Shortage) राहणार आहे. (Thane Water Shortage)
(हेही वाचा – Pakistani Spy: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; ऑपरेशन सिंदूरची माहिती पाठवणाऱ्या गुप्तहेराला अटक)
परिणामी, बुधवार ०४ जून रोजी स. ९.०० ते रा. ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Uttar Pradesh : पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क)
दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.