Fire : फटाके उडवताना ठाण्यात गुहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहने जळून खाक

64
Fire : फटाके उडवताना ठाण्यात गुहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहने जळून खाक
Fire : फटाके उडवताना ठाण्यात गुहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहने जळून खाक

ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत (Fire) तब्बल १३ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. दिवाळीच्या निमित्ताने पुरेशी खबरदारी न घेतल्याने ही घडली.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील कचराळी तलावाजवळ सरोवर दर्शन टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे, ठाणे पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले जात होते. ही दुर्घटना नेमकी घडली कशी, पार्किंगसारख्या दाटीवाटीसारख्या भागात फटाके फोडण्यास परवानगी कोणी दिली, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित केले जात पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(हेही वाचा – PM Kisan Samman Nidhi योजनेचा 15वा हफ्त्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा)

ठाण्यात अल्मेडा रोडवर सरोवर दर्शन टॉवरच्या पहिल्या मजल्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लागल्याची माहिती पाचपाखाडी अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान पोहचले. त्यांनी तब्बल ४५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत १३ दुचाकी व ३ चारचाकी वाहनांना आग लागली होती. आग लागलेल्या १३ दुचाकींपैकी ११ दुचाकी पूर्णतः जळाल्या असून इतर चारचाकी वाहनेही जळाल्याने त्यांचे नुकसान झाले. पार्किंग परिसरात फटाके पेटवल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.