Thane Building Lift Accident : मृतांचा आकडा वाढला; काही कामगार गंभीर जखमी

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली.

89
Thane Building Lift Accident : मृतांचा आकडा वाढला; काही कामगार गंभीर जखमी

ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची (Thane Building Lift Accident) लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना रविवारी (१० सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास घडली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्यास सुरुवात झाली. तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Gadchiroli Police : ताडगावच्या जंगलातून ३ नक्षलवाद्यांना अटक)

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली (Thane Building Lift Accident) इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार दास (वय २१ वर्ष) या मजुराचा मृत्यू झाला असून या कामगाराला (Thane Building Lift Accident) निपुण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारावेळेस त्याचा मृत्यू झाला. सध्या सदर कामगारांची बॉडी सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.