-
प्रतिनिधी
सोलापूरमधील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात सोमवारी पहाटे भीषण आग लागून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून, राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Textile Factory Fire)
राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करत म्हटलं, “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.” त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदतीचा निर्णय घेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Textile Factory Fire)
(हेही वाचा – Operation Sindoor Delegation : केंद्राच्या शिष्टमंडळाला ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा; पक्षाचा संजय राऊतांना घरचा आहेर)
घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा संचालनालयातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांना कायद्यानुसार सर्व लाभ तत्काळ मिळवून दिले जातील, अशी ग्वाही फुंडकर यांनी दिली आहे. (Textile Factory Fire)
या दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहिले जात असून, सोलापूर एमआयडीसीमधील अतिधोकादायक, धोकादायक आणि रासायनिक कारखान्यांचे विशेष पथकाद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा अपघात भविष्यात पुन्हा घडू नये, यासाठी कारखान्यांच्या अग्निसुरक्षा आणि कामगार सुरक्षेची कठोर तपासणी केली जाणार असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही संकेत कामगार मंत्र्यांनी दिले आहेत. (Textile Factory Fire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community