
ऋजुता लुकतुके
Tesla Cyber Truck in India : एलॉन मस्क यांच्या टेस्ला (Tesla car) कंपनीचा सायबर ट्रक (Cyber Truck) अखेर भारतात दाखल झाला आहे. सुरतचे हिरे व्यापारी लवजी बादशाह या सायबर ट्रकचे मालक आहेत. त्यांनी दुबई मार्गे हा सायबर ट्रक भारतात (Cyber Truck India) आणला आहे. शुक्रवारी दुबईतून भारतात सायबर ट्रक निघाला असल्याची बातमी सीमाशुल्क विभागाकडून माध्यमांना मिळाली होती. पण, तो नेमका कुणी विकत घेतला याची स्पष्टता नव्हती. पण, आता लवजी बादशाह यांचे सायबर ट्रकबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले आहेत. (Tesla Cyber Truck in India)
(हेही वाचा – Bangladeshi Infiltrator : सुरत, अहमदाबादमध्ये घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई ! ५०० हून अधिक बांगलादेशी ताब्यात)
सुरतचे (Cyber Truck Surat) लालजी बादशाह हे महागड्या गाड्यांचे शौकिन आहेत. त्यांना हा सायबर ट्रक नेमका किती रुपयांना पडला हे मात्र अजून समोर आलेलं नाही. अमेरिकेत त्याची किंमत ७०,००० अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. लवजी यांनी दुबईत हा ट्रक खरेदी करून भारतात घेऊन आले आहेत. तो सुरतच्या रस्त्यावर फिरतानाचा एक व्हीडिओ सध्या ट्विटरवर फिरत आहे.
🚨 Tesla Cybertruck on the streets of Surat, India. pic.twitter.com/RgfWMQD6rQ
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) April 25, 2025
सायबर ट्रक हा नेहमीच्या गाड्यांपेक्षा ३० टक्के जास्त मजबूत आहे. हा ट्रक स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, त्याची रचना इतर कार डिझाइनपेक्षा वेगळी आहे. त्याला गोलाकार पृष्ठभाग नाहीत. या सायबर ट्रकमध्ये विशेष बुलेटप्रूफ काच देखील आहे. टेस्ला कंपनी भारतातही येऊ पाहत आहे. आणि कंपनीची पहिली शोरुम मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलात उघडणार आहे. त्यासाठी जागेचा करार नुकताच पार पडला आहे.
(हेही वाचा – Indo – Pak Trade : वाघा सीमा बंद झाल्यावर भारत – पाक व्यापारावर असा होतोय परिणाम )
टेस्ला कंपनी वांद्रे – कुर्ला संकुलातील (Bandra – Kurla Complex) एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर ४,००० चौरस फूट जागा घेत आहे. येथे ते त्यांच्या कार मॉडेल्सचे प्रदर्शन आणि विक्री करेल. कंपनी या जागेसाठी मासिक भाडेपट्टी सुमारे ९०० रुपये प्रति चौरस फूट किंवा सुमारे ३५ लाख रुपये मोजणार आहे. भाडेपट्टा करार पाच वर्षांसाठी आहे.
हेही पहा –