नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये वर्ष २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा अंतिम टप्प्यांत आहेत. या निविदांना लवकरच मान्यता देण्यात येतील. तसेच सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Nashik-Trimbakeshwar Simhastha) गोदावरी अविरत निर्मळ वाहती ठेवण्यासाठी जलसंपदामंत्र्यांनी चांगली योजना आखली असून त्यालाही मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तेराही आखाड्यांच्या साधू-महंतांची बैठक पार पडली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “सिंहस्थानिमित्ताने चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तसेच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडावर स्नानासाठी जागेची कमतरता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभारण्याबाबत एकमत झाले आहे.
यंदा कुंभपर्वात अमृत स्नानाच्या तारखा अधिक आहेत. त्यामुळे एकाच तारखेला गर्दी करण्याची आवश्यकता नाही. कुंभपर्वाचा कालावधी अधिककाळ असल्याने गर्दी नियोजनाची संधी मिळणार आहे.
कोणत्या दिवशी होणार अमृतस्नान ?
त्र्यंबकेश्वर
२०२७ : ३ जुलै (दर्श अमावस्या), ४ जुलै (अमावास्या), १४ जुलै (आषाढी एकादशी), १८ जुलै (गुरूपौर्णिमा), ३१ जुलै (शनिप्रदोष), ६ ऑगस्ट (नागपंचमी), १२ ऑगस्ट (पुत्रदा एकादशी), १७ ऑगस्ट (राखीपौर्णिमा), २४ ऑगस्ट (कृष्ण जन्माष्टमी), २८ ऑगस्ट (अजा एकादशी), ५ सप्टेंबर (ऋषिपंचमी), १५ सप्टेंबर (पौर्णिमा), २७ सप्टेंबर (सोमप्रदोष), २९ सप्टेंबर (सर्वपित्री अमावस्या), १४ ऑक्टोबर (कोजागरी पौर्णिमा), २६ ऑक्टोबर (गुरुद्वादशी), १० नोव्हेंबर (प्रबोधिनी एकादशी), १३ नोव्हेंबर (त्रिपुरारी पौर्णिमा)
२०२८ : २१ मार्च (पापमोचनी एकादशी), २७ मार्च (गुढीपाडवा), ३ एप्रिल (श्रीराम नवमी), २७ एप्रिल (अक्षय तृतीया), २९ एप्रिल (श्री शंकराचार्य जयंती), १ मे (गंगा जन्मोत्सव), २ जुलै (आषाढी एकादशी), ६ जुलै (गुरूपौर्णिमा), २१ जुलै (दर्श अमावस्या), २४ जुलै (ध्वजावतरण, सिंहस्थ समाप्ती). (Nashik-Trimbakeshwar Simhastha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community