Microsoft Overtakes Apple : ॲपल नाही तर ‘ही’ आहे जगातील सगळ्यात मौल्यवान कंपनी

२०२१ नंतर प्रथमच ॲपलची अव्वल स्थानावरून गच्छंती झाली आहे.

168
Microsoft Overtakes Apple : ॲपल नाही तर ‘ही’ आहे जगातील सगळ्यात मौल्यवान कंपनी
Microsoft Overtakes Apple : ॲपल नाही तर ‘ही’ आहे जगातील सगळ्यात मौल्यवान कंपनी
  • ऋजुता लुकतुके

२०२३ मध्ये ॲपल कंपनीसमोर घटत्या मागणीची चिंता वाढतेय. आणि याचा परिणाम जानेवारीपासून ॲपल कंपनीच्या शेअरवरही जाणवत आहे. त्याचा परिणाम म्हणून आता कंपनीचं बाजारमूल्य २.८७१ अमेरिकन डॉलरपर्यंत खाली आलं आहे. आणि उलट वॉशिंग्टनमध्ये मुख्य कार्यालय असलेली मायक्रोसॉफ्ट कंपनी आता पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे शेअर १.६ टक्क्यांनी वाढले आहेत. मायक्रोसॉफ्टचं ताजं बाजारमूल्य आहे २.८७५ अब्ज अमेरिकन डॉलर. एकट्या जानेवारी महिन्यात ॲपल कंपनीचे शेअर ३ टक्क्यांनी खाली आले. यापूर्वी ॲपल कंपनीची मुख्य बाजारपेठ चीन ही होती. पण, तिथूनच ॲपलच्या फोनना मागणी घटलीय. आणि परिणामी जागतिक बाजारातच ॲपलची मागणी घटताना दिसतेय.

(हेही वाचा – Ind vs Afg 1st T20 : मोहालीच्या थंडीत अक्षर, शुभमन आणि कुलदीपची ‘अशी’ झाली फजिती)

खरंतर ॲपल कंपनीसाठी २०२३ हे वर्ष शेअर बाजारात खूप चांगलं गेलं होतं. १४ डिसेंबरला कंपनीचं मूल्य ३.०८१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं वाढलेलं होतं. आणि एकंदरीत गेल्यावर्षी कंपनीच्या शेअरमध्ये ४८ टक्क्यांची वाढ झाली. पण, त्यानंतर मात्र जानेवारीपासून शेअरमध्ये मोठी घट झाली आहे.

दुसरीकडे, मायक्रोसॉफ्ट कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट-जीपीटी कंपनीशी करार करून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. आणि तिथे जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नवीन वर्षात चांगली सुरुवात केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.