Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहते रस्त्यावर, पोलिसांवरील ताण वाढला

90
Team India Vijay Yatra : टीम इंडियाची विजय यात्रा, गर्दी हाताळताना पोलिसांची दमछाक 
Team India Vijay Yatra : टीम इंडियाची विजय यात्रा, गर्दी हाताळताना पोलिसांची दमछाक 

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी नरिमन पॉईंट ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जमलेल्या क्रिकेटप्रेमींनी संपूर्ण परिसर व्यापला गेला होता, या सर्वांचा ताण पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात आला होता, मात्र अपुऱ्या मनुष्यबळातही मुंबई पोलिसांनी टीम इंडियाच्या या स्वागत यात्रेला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी चोख बंदोबस्तात ठेवत आपले कर्तव्य पार पाडले. (Team India Victory Parade)

टी-२० विश्वचषक विजेते टीम इंडिया गुरुवारी दुपारी ५ वाजता मुंबईत दाखल झाली. टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर गर्दी केली होती. नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून टीम इंडियाची विजय यात्रा पार पडणार असल्यामुळे या विजय यात्रेला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस दलाकडून मागील काही दिवसापासून तयारी सुरू होती. अपुरे मनुष्यबळ असताना देखील मुंबई पोलीस दलाकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मरीन ड्राईव्ह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विजय यात्रेला गालबोट लागू नये यासाठी पोलीसांकडून काळजी घेतली जात होती, वाढती गर्दी पहाता मुंबई पोलिसांनी नागरिकांना मरिन ड्राइव्हकडे जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. (Team India Victory Parade)

(हेही वाचा – Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणी किती? किती वाढला साठा… जाणून घ्या!)

गुरुवारी संध्याकाळी एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियमभोवती चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मरीन ड्राइव्हकडे जाणे टाळावे.” असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकून करण्यात आले होते. मरीन ड्राईव्ह या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या क्रिकेटप्रेमींना आवर घालताना पोलीस यंत्रणेवर येणारा ताण दिसून येत होता. (Team India Victory Parade)

मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी हे स्वतः मरीन ड्राईव्ह येथे हजर होते. जवळपास २ अप्पर पोलिस आयुक्त ६ पोलीस उपायुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त आणि परिमंडळ १ आणि २ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदार असे जवळपास ५०० मुंबई पोलीस आणि राज्यराखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, गृहरक्षक दल बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आले होते. (Team India Victory Parade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.