
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीच्या निर्णयाला अखेर शासनाने स्थगिती दिली आहे. शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे राज्यभरातील शेकडो अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Teacher Recruitment)
गेल्या काही महिन्यांपासून समायोजन नाकारलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले होते. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या संदर्भात न्यायालयाने समायोजन प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतरही ती सुरू होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Dr. Mahesh Palkar) यांनी आता स्पष्ट आदेश काढून, संपूर्ण समायोजन प्रक्रिया आणि वेतन बंदीला स्थगिती दिली आहे. हे आदेश मुंबईसह संपूर्ण राज्यात लागू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Teacher Recruitment)
(हेही वाचा – Transnational Drug Syndicate चा प्रमुख नवीन चिचकर मलेशियातून हद्दपार, एनसीबी ने केली अटक )
या विषयावर शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि माजी आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) आणि शिक्षण सचिव रणजितसिंह देओल (Ranjit Singh Deol) यांची भेट घेऊन, न्यायालयीन आदेशाच्या पार्श्वभूमीवर समायोजन आणि वेतनबंदी सुरू ठेवणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आरटीई कायदा व महाराष्ट्र सेवा शर्ती नियमावली 1981 शी विसंगत असल्याचेही अधोरेखित केले. (Teacher Recruitment)
यानंतर शासनाने त्वरेने भूमिका बदलून शिक्षण संचालकांमार्फत आदेश जारी केले असून, समायोजनास नकार दिलेल्या शिक्षकांचे वेतनही पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईसह राज्यातील शेकडो शिक्षकांचे भवितव्य सावरणार आहे.
आज शिक्षण संचालक डॉ. पालकर (Dr. Mahesh Palkar) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, “कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मुंबईतील शिक्षकांना बाहेर पाठविणे किंवा त्यांचे वेतन थांबवणे या दोन्ही प्रक्रिया तूर्त थांबवण्यात येत आहेत,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. (Teacher Recruitment)
या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षण मंत्री, सचिव व संचालक यांचे सुभाष मोरे (Subhash More) यांनी आभार मानले असून, शिक्षकांच्या हक्कासाठीचा लढा पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community