तमिळनाडूतील (Tamil Nadu) हिंदूद्रोही द्रमूक सरकारने तेथील २१ मंदिरांमधील भाविकांनी दान केलेले १००० किलोहून अधिक सोने वितळवले. या सोन्याचे २४ कॅरेट सोन्याच्या नाण्यांमध्ये रूपांतर करण्यात आले. ही नाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) सुवर्ण गुंतवणूक योजनेअंतर्गत (Gold Investment Scheme) जमा करण्यात आली. या सोन्यावर बॅंकेत प्रतिवर्षी १७.८१ कोटी रुपये व्याज मिळेल, असा सरकारने दावा केला आहे.
(हेही वाचा – बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले credit card; बँकेलाच एक कोटी २६ लाखांना फसवले)
मुंबईतील सरकारी टांकसाळीत मंदिरांत भाविकांना श्रद्धेने दान केलेले सोने वितळवले गेले. सोन्यातून मिळणाऱ्या व्याजाचे पैसे मंदिरांच्या विकासासाठी वापरले जाणार आहेत, असे सांगितले जात आहे. ही माहिती हिंदू धार्मिक आणि धर्मादाय (HR&CE) मंत्री पीके सेकर बाबू यांनी तमिळनाडू विधानसभेत दिली.
३१ मार्च २०२५ पर्यंत, २१ मंदिरांमधून एकूण १०,७४,१२३.४८८ ग्रॅम शुद्ध सोने जमा झाले होते. सर्वाधिक योगदान तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) जिल्ह्यातील समयापुरम येथील अरुल्मिगु मरियम्मन (Arulmigu Mariamman) मंदिराने दिले. या मंदिराने एकट्याने गुंतवणूक योजनेसाठी सुमारे ४२४.२६ किलो सोने दिले. सोन्यानंतर, आता सरकारने मंदिरांना न वापरलेल्या आणि निरुपयोगी चांदीच्या वस्तू वितळण्याची परवानगी दिली आहे.
हिंदु धर्माला डेंग्यु, मलेरिया म्हणून हिणवणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारने विकासासाठी पैसे उभे करण्यासाठी मात्र मंदिरांच्याच संपत्तीचा वापर केला आहे, यासाठी भाविक संताप व्यक्त करत आहेत. (Tamil Nadu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community